कोल्हापूर, नाशिक जिल्हा परिषद निवडणूक 2019: भाजप पराभूत; सत्तांतर करत महाविकासआघाडी सत्तेत
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार (Maha Vikas Aghadi) स्थापन झाल्यानंतर नाशिक (Nashik) पाठोपाठ कोल्हापूर (Kolhapur) येथील जिल्हापरिषदेतही भाजपला मोठा पराभव सहन करावा लागला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार (Maha Vikas Aghadi) स्थापन झाल्यानंतर नाशिक (Nashik) पाठोपाठ कोल्हापूर (Kolhapur) येथील जिल्हा परिषदेतही भाजपला मोठा पराभव सहन करावा लागला आहे. काँग्रेस नेते बजरंग पाटील (Bajrang Patil) यांनी भाजपच्या अरुण इंगवले (Arun Ingawale) यांचा पराभव करत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. तर नाशिक जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने भगवा फडकला असून शिवसेना नेते बाळासाहेब क्षीरसागर (Balasaheb Kshirsagar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळाल्या असूनही त्यांना राज्यात सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून भाजपची नामुष्की होत आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर याचा फटका भाजपला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही बसला आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने महाविकास आघाडीला भाजपकडून सत्ता खेचून घेण्यात यश आले आहे. काँग्रेसचे बजरंग पाटील यांनी भाजपचे अरुण इंगवले यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे. बजरंग पाटील यांना 41 तर इंगवले यांना अवघ्या 24 मतांनी पराभूत केले आहे. तर नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. नाशिक जिल्हा परिषदेत एकूण 72 सदस्यांपैकी शिवसेनेचे 25, राष्ट्रवादीचे 15 आणि काँग्रेसचे 8 सदस्य आहेत. हे देखील वाचा- 'शिवभोजन नाव बदलून अटीभोजन करा' नीलेश राणे यांचा शिवसेनेला टोला
चंद्रकांत पाटील यांचे ट्वीट-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतील अधिक जागा होत्या. परंतु मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. यानंतर शिवसेनाने काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची हात मिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. तेव्हा पासून भाजपची घसरण सुरु झाल्याची चिन्ह दिसू लागले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)