सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिवे लावण्यामागचे मूळ कारण, पाहा ट्विट
पण या सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते. जे वाढणे आजच्या संकट समयी काळाची गरज आहे, " असं ट्वट मुनगंटीवार यांनी केलं आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आज रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील विजेवर चालणार प्रकाशदिवे बंद करून मेणबत्ती, दिवे, मोबाईलची टॉर्च किंवा फ्लॅश लावण्याचं आवाहन केलं आहे. मोदींनी ही घोषणा केल्यानंतर काहींनी त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले तर काहींनी त्यांच्यावर टिका केली. त्यात विरोधकांनी देखील त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र या सर्वाचे महत्व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ट्विटच्या माध्यमातून पटवून दिले आहे. लोकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मोदींनी हे आवाहन केले आहे असे ते म्हणाले आहेत.
"दिवे लावून, टाळ्या वाजवून करोना जाणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माहित आहे. पण या सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते. जे वाढणे आजच्या संकट समयी काळाची गरज आहे, " असं ट्वट मुनगंटीवार यांनी केलं आहे.
पाहा ट्विट:
हेदेखील वाचा- 5 एप्रिल रोजी दिवे लावण्याच्या आवाहनाचे आठवण करुन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'शॉर्ट अँड स्वीट' ट्विट
त्याचबरोबर आजचा मोदीजींचा उपक्रम किती योग्य आहे हे पटवून देण्यासाठी त्यांनी रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी बोस, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काही उदाहरणं दिली आहे.
कोरोना व्हायरस संकटाचा अंधःकार दूर करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या दारात किंवा गॅलरीत 9 मिनिटांसाठी दिवा, मेणबत्ती लावावी किंवा मोबाईल टॉर्च ऑन करावा असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. आज 5 एप्रिल असल्याने त्यांनी केलेल्या आवाहनाची आठवण करुन देताना मोदींनी अगदी 'शॉर्ट अॅण्ड स्वीट' ट्विट केले आहे.