Pankaja Munde Letter to Rajesh Tope: पंकजा मुंडे यांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र; बीड जिल्ह्याला पुरेसे रेमडेसिवीर इंजेक्शन, कोविड लसी उपलब्ध करुन देण्याची मागणी

यासंदर्भात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पंकजा मुंडे (Photo Credits: Facebook)

राज्यात दिवसागणित होणारी मोठी कोरोना रुग्णवाढ चिंताजनक असून त्यात आरोग्य सुविधांसह लसींचा तुटवडा ही अत्यंत गंभीर बाब आहे. बीड (Beed) जिल्ह्यातही रेमडेसिवीर इंजेक्शन (Redmisiver Injection), कोविड लस (Covid-19 Vaccine) यांचा तुटवडा जाणवत आहे. यासंदर्भात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांना पत्र लिहून याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसंच बीड जिल्ह्यासाठी पुरेसे रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लसी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. हे पत्र त्यांनी ट्विटच्या माध्यमातून शेअर केले आहे. (Coronavirus In Beed: एकाच चितेवर आठ कोरोना रुग्णांचे अंत्यसंस्कार, बीड जिल्हयातील COVID 19 स्थिती)

पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले, "रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे. आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीड ला ही पुरेशा लसी मिळाल्या पाहिजेत." बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला आहे.

पत्रात पंकजा मुंडे लिहितात, "बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर लसी पुरेशा प्रमणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. यात आरोग्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना लस उपलब्ध करुन द्यावेत."

पंकजा मुंडे ट्विट:

दरम्यान, आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात एकूण 34 हजार 989 कोरोना रुग्ण असून त्यापैकी 30 हजार 478 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण 729 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.