Nitesh Rane On Lookout Notice: राणे कुंटुंबाची नव्हेतर, क्राईम ब्रॅंच आणि महाविकास आघाडीची अडचण होणार; लुकआउट नोटीशीवर नितेश राणे यांची प्रतिक्रिया

कर्जाची परतफेड न झाल्याने त्यांना पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे.

Nitesh Rane (Photo Credit: Twitter)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पत्नी नीलम राणे (Neelam Rane) आणि त्यांचा मुलगा नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविरोधात पुणे पोलिसांकडून (Pune Police) लूकआऊट नोटीस (Lookout Notice) जारी केली आहे. कर्जाची परतफेड न झाल्याने त्यांना पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे. यावर स्वत: नितीश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, नारायण राणे कुटंबाची नव्हेतर, क्राईम ब्रॅंच आणि महाविकास आघाडीची अडचण होणार, अशा शब्दात नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

नितेश राणे म्हणाले की, पुणे पोलिसांनी हे सेर्क्युलर काढले आहे. आमचे डीएचएफएलचे खाते मुंबई ब्रॅंचमध्ये आहे. परंतु, पुणे क्राईम ब्रॅंचला हा अधिकार कसा? असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे. तसेच आम्ही 5 महिन्यांपूर्वी संबंधित बॅंकेला लोन सेटल करण्यासाठी अधिकृत पत्र दिले आहे. यामुळे अशा नोटीसाचा उपयोग नाही. याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. यामुळे नारायण राणे कुटंबाची नव्हेतर, क्राईम ब्रॅंच आणि महाविकास आघाडीची अडचण होणार, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- BMC Election: शिवसेनेला मोठा धक्का, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी नितेश राणे आणि निलम राणे यांच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून 40 कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे.