चंद्रपूर मधील दारुबंदी उठविल्यानंतर चित्रा वाघ पुन्हा आक्रमक; जयंत पाटील यांचा जूना व्हिडिओ शेअर करत विचारला जाब

यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Chitra Wagh | (Photo Credits: Facebook)

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) दोन दिवसांपूर्वी घेतला. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचा जुना व्हिडीओ ट्विट करत जाब विचारला आहे.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, यवतमाळ मध्ये दारूबंदी करू, असे आश्वासन जयंत पाटील देत आहेत. आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये यवतमाळ दारूबंदी करण्याचे पहिलं काम आम्ही करू. चंद्रपुरात दारूबंदी होते. तर यवतमाळ मध्ये का होत नाही, असा प्रश्न देखील जयंत पाटील यांनी व्हिडिओमध्ये उपस्थित केला आहे. यावरुन चित्रा वाघ यांनी 'क्या हुआ तेरा वाद जयंतरावजी' असा सवाल केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्या लिहिलात, "क्या हुवा तेरा वादा...जयंतराव जी. सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार... इस आश्वासन का... यवतमाळ राहिलं दूर..चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल."

चित्रा वाघ ट्विट:

यापूर्वी देखील 'भगिनींनो संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या रहा परत चार हात करायची वेळ आणली' या सरकारने आपल्यावर असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधला होता.

दरम्यान, चंद्रपूरात 2015 पासून दारुबंदी होती. मात्र या निर्णयामुळे  जिल्ह्यातील अवैध दारु विक्री, सेवन आणि त्यासंबंधित गुन्हेगारीत वाढ झाल्याने दारुबंदी उठवण्यात आल्याचे सरकारने सांगितले. दारुबंदी उठवण्यावर अनेक सामाजिक संघटांनी विरोध दर्शवला होता. यासाठी तब्बल 30 हजार निवेदनं सरकारकडे आली होती.



संबंधित बातम्या

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

West Indies vs Bangladesh, 2nd T20I Match Live Streaming In India: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात रंगणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या भारतात थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहाल

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांत नाराजी नाट्य सुरु; छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, रवी राणा सह पहा कोण कोण झाले खट्टू