भाजप माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्यावर गुरुवार, 27 फेब्रुवारी रोजी रात्री 3 वाजून 35 मिनिटांनी बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे आज कोणत्याही क्षणी मेहता यांना अटक केली जाऊ शकते
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्यावर गुरुवार, 27 फेब्रुवारी रोजी रात्री 3 वाजून 35 मिनिटांनी बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे आज कोणत्याही क्षणी मेहता यांना अटक केली जाऊ शकते. मीरा-भाईंदर (Mira- Bhayander) महापालिकेतील भाजपच्या एका नगरसेविकेने नरेंद्र मेहता यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तशी तक्रार कोकण महानिरीक्षकांकडे करण्यात आली होती ज्याची दखल घेऊन मीरा-भाईंदर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. अश्लिल चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाजप माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा राजीनामा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
संबधित भाजप नगरसेविकेने तक्रार करताना नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचे आरोपही लगावले होते. पीडित नगरसेविकेने याबाबत सुरुवातीला पोलिसात न जाता भाजप वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती. मात्र, त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळे अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती.अशातच काही दिवसांपूर्वी नरेंद्र मेहता यांची एक अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, त्यानंतर त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, नरेंद्र मेहता यांच्यावरील गंभीर आरोप यापूर्वी विधानभवनात देखील चर्चेचा मुद्दा ठरला होता संबंधित पीडित महिलेने नरेंद्र मेहतांकडून शोषण होत असल्याची तक्रार 2016 मध्ये आणि जुलै 2019 मध्ये अशी दोनवेळा केली. त्यानंतरही पोलिसांनी मेहता यांच्यावर पोलिसांनी का कारवाई केली नाही? असा सवाल नीलम गोर्हे यांच्याकडून उचलण्यात आला होता तर मनीषा कायंदे यांनी देखील या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेत महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता ज्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते.