BJP Deputy Mayor Rajesh Kale Tadipaar: भाजप निलंबीत नगरसेवक, उपमहापौर राजेश काळे तडीपार; सोलापूर पोलिसांची कारवाई
राजेश काळे यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता सोलापूर पोलिसांनी राजेश काळे (Rajesh Kale) यांना तडीपार करण्यात आले आहे.
भाजपचे (BJP) निलंबीत नगरसेवक, सोलापूर (Solapur) येथील उपमहापौर राजेश दिलीप काळे यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. राजेश काळे यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता सोलापूर पोलिसांनी राजेश काळे (Rajesh Kale) यांना तडीपार करण्यात आले आहे. राजेश काळे यांना सोलापूर, उस्मानाबाद (Osmanabad) आणि पुणे (Pune) जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातून पुढील दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. सोलापूर शहर पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. राजेश काळे यांच्यावरील कारवाईमुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
राजेश काळे यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आणि अत्यंत वादग्रस्त राहिली आहे. दरम्यान, त्यांनी भारतीय पक्षातून महापालिका निवडणुकीत उमेदवारी केली. निवडणुकीत जुळे भागातून निवडूण आल्यानंतर भाजपकडून त्यांना सोलापूर महापालिकेचे उपमहापौर पदावर काम करण्याची संधी देण्यात आली. मात्र, पदावर कार्यत झाल्यानंतरही राजेश काळे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी कायम राहिल्याचे पोलीसांकडील नोंदविरुन पुढे आले. परिणामी पोलिसांनी ही कारवाई केली. (हेही वाचा, Solapur Deputy Mayor Rajesh Kale Expelled From BJP: उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी; उपायुक्तांना शिवीगाळ, खंडणी प्रकरणी कारवाई)
प्राप्त माहितीनुसार, उपमहापौर राजेश काळे यांच्यावर पदाचा दुरुपयोग, नियमबाह्य पद्धतीने कामे करणे ती कामे पुढे रेटने, कामे करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, व्यवसायिकांना धमकावणे, त्यांच्याकडून खंडणी मागणे, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ॲट्रासिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे, शासकीय कामकाजात अडथळा अशा विविध स्वरुपांचे गुन्हे राजेश काळे यांच्यावर दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांची दखल घेऊन सोलापूर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी काढलेल्या आदेशानुसार पोलिसांनी काळे यांच्यावर तडीपारीची कारवाई केली. राजेश काळे यांच्यावर झालेली तडीपारीची कारवाई दोन वर्षांसाठी आहे. तसेच, त्यांना सोलापूर, उस्मानाबाद आणि इंदापूर (जि. पुणे) येथून तडीपार करण्यात आले आहे.