संजय मंडलिक यांच्या बंडखोरीमुळे कोल्हापूर मध्ये भाजपचा पराभव– चंद्रकांत पाटील
शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांच्या बंडखोरीमुळे कोल्हापूरमध्ये (Kolhapur) भाजपचा (BJP) पराभव झाला, असे विधान करुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना- भाजप यांच्यात सुरु असलेल्या वादात भर टाकली आहे.
शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांच्या बंडखोरीमुळे कोल्हापूरमध्ये (Kolhapur) भाजपचा (BJP) पराभव झाला, असे विधान करुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना- भाजप यांच्यात सुरु असलेल्या वादात भर टाकली आहे. भाजप- शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन आधिच वाद पेटला आहे. यातच चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे नुकतीच पार पडली पडलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर आरोप केला आहे. ज्या नेत्यांनी बंडखोरी केली त्यांची हाकलपट्टी तर आम्ही करणारच आहोत. पण, मूळ शिवसैनिकांनी येऊन सोयीचे राजकारण करणाऱ्या संजय मंडलिक यांना बाजूला ठेवावे, असे देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपा-शिवसेनेला राज्यभरात विविध निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवले आहे. आमच्या सरकारने सर्वत्र चांगली कामही केली आहेत. मात्र, तरीदेखील अनेक ठिकाणी आमचा पराभव झाला. त्यामुळे आम्ही सर्वजण चिंतेत आहोत याचे आत्मचिंतनही आम्ही करतो आहोत. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. आम्ही जनतेला विचारु इच्छितो की, आम्ही प्रामाणिकपणे काम केले मग आमचे चुकले कुठे हे जनतेनेआम्हाला सांगावे. याबाबत जर पत्रकार आणि सामान्य नागरिकांकडून आम्हाला कळले तर, आम्ही त्यावर काम करु. हे देखील वाचा- मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक संतप्त; चुनाभट्टी-बीकेसी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची केली मागणी
तसेच, भाजपने या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मत मिळाली असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 2014 साली 260 जागा लढवून 122 जागा जिंकल्या होत्या. परंतु, या विधानसभा निवडणुकीत भाजपने कमी जागा लढवून 105 जागा जिंकल्या आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. साताऱ्यामध्ये उदयनराजे यांचा झालेला पराभव जिव्हारी लागला असून, याआधी जशी इतर लोकांची काळजी घेतली त्याचप्रमाणे उदयनराजेंची काळजी घेतली जाईल. त्यांचा सन्मान केला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.