'मोदी सरकार जाणार नाही तोपर्यंत शर्ट घालणार नाही' कांदा उत्पादक शेतकऱ्याने घेतली शपथ
'मी आजून तरुण आहे. म्हातारा झालो नाही. त्यामुळे मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचत घरी बसविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही', असे या शेतकऱ्याने सांगितले.
Lok Sabha Elections 2019: 'मोदी सरकार (Modi Government) सत्तेतून जाणार नाही, तोपर्यंत अंगात शर्ट न घालता अर्धनग्न राहणार' अशी शपथ एका तरुण शेतकऱ्याने घेतली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला (Yeola) तालुक्यात असलेल्या नगरसुल (Nagarasul) या गावातील हा शेतकरी आहे. कृष्णा डोंगरे (Krishna Dongre) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे आपल्या निर्धाराबाबतचे एक निवेदनही डोंगरे यांनी निफाड (Niphad) येथे दिले. 'अच्छे दिन' येणार असे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजप प्रणित मोदी सरकारने प्रत्यक्षात मात्र तसे दिवस दाखवले नाहीत. शेतमालाला हमीभाव देण्याचे अश्वासन देऊनही प्रत्यक्षात कांदा कवडीमोल भावाने बाजारात विकावा लागतोय. याचा निशेध म्हणून तीन वर्षांपूर्वी पाच एकर कांदा जाळून निशेध केला. अखेर अंगात असलेला शर्ट, बनियन आणि पायातील चप्पलही मोदींना पाठवली तरीही त्याची दखल घेण्यात आली नाही, अशी व्यथाही या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
मोदी सरकारच्या कारभाराबाबत बोलताना कृष्णा डोंगरे यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. 'मी आजून तरुण आहे. म्हातारा झालो नाही. त्यामुळे मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचत घरी बसविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही', असे या शेतकऱ्याने सांगितले. (हेही वाचा, उस्मानाबाद: 'ओमराजे निंबाळकर जिंकले तर माझी मोटारसायकल तुमची', शेतकरी-मजूर यांच्यात करारनामा)
'NCP' 'ट्विट
दरम्यान, निफाड येथील सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. देशाची अर्थव्यवस्था ही शेती आणि शेतकऱ्यांवर आधारीत आहे. असे असताना गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. मीही कृषीमंत्री होतो. त्या वेळी शेतकऱ्यांच्या शेतमालाची भाववाढ झाली की, मला संसदेत प्रश्न विचारला जायचा. त्या वेळी मी ठासून सांगायचो की, मला खाणाऱ्या पेक्षा पिकवणारा महत्त्वाचा वाटतो. जर शेतकऱ्याने पिकवलेच नाही तर, खाणारे काय खातील? असा माझा सवाल असायचा. त्यामुळे शेतकरी विरोधी असलेल्या सरकारला घरी बसविल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.