औरंगाबाद: भाजप कार्यकर्त्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सांगितलं 'हे' धक्कादायक कारण
या कार्यकर्त्याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण सांगितले आहे. पंकज संकपाळे, असे या कार्यकर्त्यांचे नाव आहे. पंकजने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
औरंगाबादमध्ये (Aurangabad) भाजप कार्यकर्त्याने (Bjp Activist) आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या कार्यकर्त्याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट (Suicide Note) लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण सांगितले आहे. पंकज संकपाळे, असे या कार्यकर्त्यांचे नाव आहे. पंकजने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
पंकज हा भाजपचा कार्यकर्ता असून तो माहिती व अधिकारामध्ये काम करत होता. दरम्यान, पंकजच्या कामासंदर्भात त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पंकज त्रस्त होता. या प्रकरणामुळे उस्मानपुरा पोलिस स्थानकातील पोलिस त्याला त्रास देत होते. पोलिसांच्या जाचाला कंटाळून पंकजने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा - सांगली: कवठे महांकाळ पंचायत समिती माजी सभापती मनोहर पाटील यांची हत्या, एका आठवड्यात राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांचा खून)
या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजने आत्महत्या करण्याअगोदर सुसाईड नोट लिहली होती. यात त्याने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. तसेच पंकजने या सुसाईड नोटमध्ये या प्रकरणाशी संबंधित 3 पोलिसांचे नावे सांगितले आहेत. पंकजच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंकजचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कवठे महाकाळ पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पाटील यांचा खून केल्याची घटना उघडकीस आली. तसेच चार दिवसांपूर्वीच आनंदराव पाटील यांची हत्या करण्यात आली होती. राजकीय नेत्यांच्या हत्येमुळे सांगली जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.