Lonavala: वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायला गेलेल्या दोघांचा खाणीत बुडून मृत्यू, लोणावळ्याच्या कुसगाव परिसरातील घटना

ही घटना लोणावळ्याच्या (Lonavala) कुसगाव (Kusgaon) येथे गुरूवारी घडली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

वाढदिवसाचे सेलिब्रेशन (Birthday Celebration) करायला गेलेल्या तरूणांपैकी 2 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू (Drown) झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना लोणावळ्याच्या (Lonavala) कुसगाव (Kusgaon) येथे गुरूवारी (1 जुलै) घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती त्वरित लोणावळा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर शिवदुर्ग बचाव पथकाने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेत मरण पावलेल्या दोघांच्या कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या तरूणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी फिरायला आले होते. त्याचाही पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश गुरव आणि धिरेंद्र त्रिपाठी असे मृत तरूणांची नावे आहेत. हे दोघेही पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील रहिवाशी होते. आकाशचा गेल्या आठवड्यात वाढदिवस झाला होता. या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी आकाश, धिरेंद्र यांच्यासह अन्य तिघ मित्र लोळावण्याला फिरायला आले होते. दरम्यान, आकाश आणि धिरेंद्र हे दोघे ही खाणीत पोहण्यासाठी उतरले तेव्हा, त्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने पोहत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. हे देखील वाचा-Tamil Nadu: फेसबूक, व्हाट्सअपवर राहायची सतत ऑनलाईन, संतापलेल्या भावने केली बहिणीची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्देवी घटना गुरुवारी (1 जुलै 2021) दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. तर, शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.



संबंधित बातम्या