Bird Flu in Parbhani Update: परभणीत बर्ड फ्लू मुळे झालेल्या कोंबड्यांच्या मृत्यूनंतर 10 किमी अंतरावरील खरेदी विक्रीवर बंदी

या कोंबड्यांची बर्ड फ्लू ची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. याच कारणास्तव आता मुरंबा गावात 10 किमी अंतरावर असलेल्या चिकन शॉप मधून कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

बर्ड फ्लू (फोटो सौजन्य- फेसबुक)

Bird Flu in Parbhani Update: देशासह आता राज्यात कोरोनापाठोपाठ बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने आता अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू होत असल्याने राज्य सरकारने त्या संदर्भातील उपाययोजना सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर शनिवारी परभणी येथील मुरंबा गावात जवळजवळ 800 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. या कोंबड्यांची बर्ड फ्लू ची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. याच कारणास्तव आता मुरंबा गावात 10 किमी अंतरावर असलेल्या चिकन शॉप मधून कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

परभणीतील जिल्हाधिकाऱ्यांनी असे म्हटले की, मुरंबा गावातील 1 किमी अंतरावर असलेल्या पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांना एकत्रित केले जाणार आहे. त्याचसोबत कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यासह गावातील सर्व नागरिकांची विषाणूची चाचणी केली जात आहे. यासाठी वैद्यकीय पथके येथे दाखल झाल्याची माहिती सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.(Bird Flu: एवियन फ्लू चा धोका! जाणून घ्या काय आहेत बर्ड फ्लूची लक्षणे, कारणे, उपचार आणि कशाप्रकारे करू शकाल बचाव)

Tweet:

दुसऱ्या बाजूला आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा बर्ड फ्लू संदर्भातील परिस्थितीचा आज आढावा घेण्यासाठी महत्वाची बैठक घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे बर्ड फ्लू बद्दल कोणता निर्णय घेतील हे पहाणे महत्वाचे ठरणार आहेत.(Birds Death Rate Increased in Maharashtra: आगोदर कोंबड्या आणि आता कावळे, बगळे, गिधाडे, पोपट; राज्यात पक्षांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले)

Tweet:

देशातील काही राज्यात बर्ड फ्लू मुळे पोल्ट्रीतील कोंबड्या, कावळे आणि स्थलांतरित पक्षांचा मृत्यू होत असल्याने परिस्थिती बिघडत चालली आहे. या संक्रमणाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री संजीव बालयान यांनी असे म्हटले की, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश आणि केरळात बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. वाढत्या प्रकरणांमुळे केंद्र सरकारने दिल्लीत कंट्रोल रुम तयार केले आहे. जे राज्यांच्या संपर्कात राहणार आहेत. भारतात पहिल्यांदाच 2006 मध्ये एवियन इंफ्लुएंजाची प्रकरणे समोर आली आहेत.