Chhagan Bhujbal on Ajit Pawar: अजित पवार यांच्यामुळे भाजपला फटका; छगन भुजबळ यांच्याकडून स्फोटक वक्तव्य; सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुनही नाराजी

दुसऱ्या बाजूला अजित पवार यांना सोबत घेतल्याने भजपला फटका बसला असे स्फोटक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.

Chhagan Bhujbal on Ajit Pawar | (Photo credit: archived, edited, representative image)

भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीत (General Election in India) महाराष्ट्रामध्ये महायुकतीचा दारुन पराभव झाला. यामध्ये सत्ताधारी भाजपला केवळ नऊ, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाला 7 तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला केवळ एक जागा मिळाली. या पराभवावरुन राज्याच्या सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार नाराजी आहे. त्यासोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर ती अधिकच आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना पक्षाने दिलेल्या राज्यसभा उमेदवारीवरुन ही नाराजी अधिकच उफाळून आली असून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या रुपात ही नाराजी उघडपणे व्यक्त झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवास अजित पवारच जबाबदार असल्याचे स्फोटक वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशीही सुनेत्रा पवार वगळता एकाही उमेदवारचा अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे राज्यसभेवर त्या बिनविरोध निवडून जातील हे निश्चित आहे. दरम्यान, त्यांच्या उमेदवारीवरुन पक्षातच नाराजी आहे. अजित पवार यांच्यावरही घराणेशाहीची टीका होऊ लागली आहे. दरम्यान, यामध्ये अजित पवार यांचा संबंध नाही. सुनेत्रा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने आणि पक्षातील नेत्यांनी मिळून घेतला आहे, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. (हेही वाचा, Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामती विधानसभा साठी युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची मागणी; कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवारांची गोविंदबागेत भेट!)

छगन भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक

सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे आपण नाराज आहात का? असे विचारले असता माझ्याकडे पाहून तुम्हाला मी नाराज वाटतो आहे का? असा प्रसारमाध्यमांनाच प्रतिप्रश्न करत छगन भुजबळ यांनी म्हटले की, हा पक्षाचा निर्णय आहे. पक्षाचा निर्णय सर्वांनी मिळून घ्यायचा असतो हे मी 57 वर्षांपासून शिकत आलो आहे. खरे तर या जागेसाठी मी इच्छुक होतो. केवळ मीच नव्हे तर माझ्यासोबतच आनंद परांजपे, बाबा सिद्दीकी यांसारखे नेतेही इच्छुक होते. मात्र, पक्षाने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे, असे भुजबळ म्हणाले. (हेही वाचा, युगेंद्र पवार यांना Ajit Pawar यांच्या कार्यकर्त्यांकडून घेराव; व्हिडिओ व्हायरल )

दरम्यान, भाजपच्या पराभवाचे विश्लेष करणारा लेख एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑर्गनायझर या दैनिकात छापून आला आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील भ्रष्ट मंत्र्यांना पक्षात प्रवेश दिल्याचा फटका भाजपला बसला असे म्हटल आहे. यावर विचारले असता छगन भुजबळ म्हणाले होय, अजित पवार यांच्यामुळे भाजपला फटका बसला आहे. हे खरे आहे. पण, असे असले तरी केवळ महाराष्ट्राबाबत पाहून चालणार नाही. देशातील इतर राज्यांमध्येही भाजपला फटका बसला असल्याचे भुजबळ म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif