Salman Khan Firing Case: सलमान खान फायरिंग केसमधील आरोपीच्या मृत्यूमागे मोठे षडयंत्र; शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेत्याकडून चौकशीची मागणी

आरोपीच्या नातेवाईकांनीही असा आरोप केला आहे.

Salman Khan (PC - Instagram)

Salman Khan Firing Case : अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घर गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींनी ताब्यात घेतले होते. चौकशी(investigation) सुरू असतानाच काल त्यातील एका आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला. अनुज थापन असे आरोपीचे नाव आहे. पोलीस कस्टडीमध्ये त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही माहिती समजताच थापनला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू ( accused death) झाला. आता त्यावर राजकीय नेत्यांकडून चौकशीची मगणी होत आहे. या प्रकरणात राजयकीय हात असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटातील (UBT) नेते आनंद दुबे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा:Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील मोठी बातमी; आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न)

"मुंबई पोलिस यांच्या क्राइम ब्रँचच्या लॉकअपमध्ये आरोपीचा मृत्यू झाला असं म्हटलं जातं... असं होणं शक्य आहे का? यात काही राजकारणी सामील आहेत, मुंबई पोलिसांचे लॉकअप इतके सुरक्षित असताना हे कसे होऊ शकते, इतके अधिकारी आहेत... हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. नक्कीच हे मोठे षडयंत्र आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी चौकशीची मागणी केली आहे."

आरोपींना मुंबई पोलीस मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. अनुजवर नेमबाजांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप होता. या गोळीबारात प्रकरणातील आरोपी विकी आणि सागर यांना कच्छ, गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. तर अनुज थापन आणि सोनू कुमार चंदर बिश्नोई यांना पंजाबमधून अटक करण्यात आली होती. अनुजवर नेमबाजांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे.