जळगावात भाजपला मोठा धक्का; 57 पैकी 30 नगरसेवक शिवसेनेत दाखल

मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेने (Shiv Sena) सत्ताधारी भाजपला (BJP) मोठा धक्का दिला आहे. भाजपचे 57 पैकी 30 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Shivsena | (Photo courtesy: archived, edited images)

जळगाव महापालिकेची (Jalgaon municipal corporation) महापौर आणि उपमहापौर निवडणूक येत्या 18 मार्च रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेने (Shiv Sena) सत्ताधारी भाजपला (BJP) मोठा धक्का दिला आहे. भाजपचे 57 पैकी 30 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जळगाव महापालिकेची जबाबदारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत्य विश्वासू सहकारी आणि भाजप नेते गिरीष महाजन यांच्यावर आहे. परंतु, गिरीष महाजनांचा राजकीय पराभव करून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच मोठा धक्का देण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महत्वाचे म्हणजे, 57 सदस्य असलेल्या भाजपकडे महापौरपद आहे. मात्र, जळगावात नव्याने महापौरांची निवड होणार असताना भाजपच्या अनेक नगरसेवक सोडचिठ्ठी देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या अनेक बंडखोर नगरसेवकांनी सोमवारी मुंबई गाठली आहे. जळगाव महापालिकेचे शिवसेनेने फोडलेले सर्व 27 नगरसेवक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे देखील वाचा- Thane District Central Co Operative Bank Election: ठाणे जिल्हा बँक निवडणूकीसाठी एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा

जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी गेल्या 5 वर्षात जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सत्ता टीकवून ठेवली आहे. जळगावात भाजपला दे धक्का देण्यासाठी राजकारणातील कट्टर विरोधाक असलेले एकनाथ खडसे आणि सुरेश जैन एकत्र येत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.