Bhusawal Crime: जळगावात तिहेरी हत्याकांडाने खळबळ, जुन्या वादातून सख्खा भावांची हत्या

भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघांची हत्येची घडली होती. त्याच्या काही तासातच कुख्यात गुन्हेगाराची हत्या झाली. या धक्कादायक घटनेने भुसावळसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जळगावमध्यल्या (Jalgaon) भुसावळ शहरात (Bhusawal City) धक्कादायक घटना समोर आली आहे. भुसावळच्या वखार परिसरातील दोन भावांची हत्या झाल्याची धक्काधायक घटना घडली आहे. तसेच काही तासातच एका कुविख्यात गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघांची हत्येची घडली होती. त्याच्या काही तासातच कुख्यात गुन्हेगाराची हत्या झाली. या धक्कादायक घटनेने भुसावळसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (हेही वाचा - Palghar: विरार येथील गृहनिर्माण संकुलात चिमुकल्याचा कारने चिरडून मृत्यू; कार चालकावर गुन्हा दाखल)

भुसावळमध्ये रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शांताराम भोलानाथ साळुंखे व राकेश भोलानाथ साळुंखे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेनंतर श्रीराम नगर परिसरात कुविख्यात गुन्हेगार निखिल राजपूत याच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या घटनेत निखिलचा मृत्य झाला. तिघांच्या हत्येने भुसावळमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघांची हत्येची घडली होती. त्याच्या काही तासातच कुख्यात गुन्हेगाराची हत्या झाली. या धक्कादायक घटनेने भुसावळसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, भुसावळ शहरासह तालुक्यात हत्या, चोरीच्या वारंवार घटना घडू लागल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement