Palghar St Bus Accident: पालघरच्या वाघोबा खिंड येथे एसटी बस 20 फूट दरीत कोसळली, 15 जण गंभीर जखमी

एसटी बस अपघातात (ST bus Accident) 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात भुसावळ ते बोईसर या एसटी (Bhusawal to Boisar ST bus) बसला पालघर येथील वाघोबा खिंड (Waghoba Ghat in Palghar) परिसरात झाला. चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|

ST bus Accident | (PC - ANI)

एसटी बस अपघातात (ST bus Accident) 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात भुसावळ ते बोईसर या एसटी (Bhusawal to Boisar ST bus) बसला पालघर येथील वाघोबा खिंड (Waghoba Ghat in Palghar) परिसरात झाला. चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बस जवळपास 20 फूट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अघातात जखमी झालेल्या सर्वांना पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मद्यधुंद अवस्थेमुळे नियंत्रण सुटल्याने बस थेट 20 फूट खोल दरीत कोसळली आणि हा अपघात घडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटले.

अपघात भीषण असला तरी कोणतीही जीवीत हानी झाली नाही. परंतू, प्रवाशांचे जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. प्रवाशांना रात्रीच्या वेळी प्रवास करता यावा यासाठी महामंडळ रातराणी बस चालवते. त्यामुळे भुसावळ ते बोईसर ही बस रात्रीचा प्रवास करत होती. प्रवास जवळपास पूर्ण होत आला होता. मात्र पहाटे सहाच्या सुमारास ही बस वाघोबा खिंडीत आली तेव्हा अपघात घडला. (हेही वाचा, Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेस वेवर मोठा अपघात; पुण्यातील 5 जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी)

ट्विट

एसटीचा चालक मद्यधुंत अवस्थेत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले होते. त्यांनी याबाबत वाहकाकडे (कंडक्टर) तक्रारही केली होती. प्रवाशांच्या तक्रारीकडे वाहकाने दुर्लक्ष केले. परिणामी अपघात घडला. एसटी चालक अत्यंत बेजबाबदारपणे आणि वेगावर कोणतेही नियंत्रण न ठेवता बस हाकत होता. त्यामुळे बसमधील अनेक प्रवाशांचा जीव घाबराघुबरा झाला होता. अle_title">Palghar St Bus Accident: पालघरच्या वाघोबा खिंड येथे एसटी बस 20 फूट दरीत कोसळली, 15 जण गंभीर जखमी

एसटी बस अपघातात (ST bus Accident) 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात भुसावळ ते बोईसर या एसटी (Bhusawal to Boisar ST bus) बसला पालघर येथील वाघोबा खिंड (Waghoba Ghat in Palghar) परिसरात झाला. चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|
Palghar St Bus Accident: पालघरच्या वाघोबा खिंड येथे एसटी बस 20 फूट दरीत कोसळली, 15 जण गंभीर जखमी
ST bus Accident | (PC - ANI)

एसटी बस अपघातात (ST bus Accident) 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात भुसावळ ते बोईसर या एसटी (Bhusawal to Boisar ST bus) बसला पालघर येथील वाघोबा खिंड (Waghoba Ghat in Palghar) परिसरात झाला. चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बस जवळपास 20 फूट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अघातात जखमी झालेल्या सर्वांना पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मद्यधुंद अवस्थेमुळे नियंत्रण सुटल्याने बस थेट 20 फूट खोल दरीत कोसळली आणि हा अपघात घडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटले.

अपघात भीषण असला तरी कोणतीही जीवीत हानी झाली नाही. परंतू, प्रवाशांचे जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. प्रवाशांना रात्रीच्या वेळी प्रवास करता यावा यासाठी महामंडळ रातराणी बस चालवते. त्यामुळे भुसावळ ते बोईसर ही बस रात्रीचा प्रवास करत होती. प्रवास जवळपास पूर्ण होत आला होता. मात्र पहाटे सहाच्या सुमारास ही बस वाघोबा खिंडीत आली तेव्हा अपघात घडला. (हेही वाचा, Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेस वेवर मोठा अपघात; पुण्यातील 5 जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी)

ट्विट

एसटीचा चालक मद्यधुंत अवस्थेत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले होते. त्यांनी याबाबत वाहकाकडे (कंडक्टर) तक्रारही केली होती. प्रवाशांच्या तक्रारीकडे वाहकाने दुर्लक्ष केले. परिणामी अपघात घडला. एसटी चालक अत्यंत बेजबाबदारपणे आणि वेगावर कोणतेही नियंत्रण न ठेवता बस हाकत होता. त्यामुळे बसमधील अनेक प्रवाशांचा जीव घाबराघुबरा झाला होता. अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्यास सुरुवात केली. सर्व जखीमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change