भिवंडी: अतिदक्षता विभाग ठेवलेल्या रुग्णाजवळ गर्दी करु नका, संतापलेल्या नातेवाईकांनी केली डॉक्टरला मारहाण

यामुळे तरुणाच्या नातेवाईकांनी अतिदक्षता विभागाकडे गर्दी केल्याने त्यांना तेथून जाण्यास डॉक्टरांनी सांगितले.

Representational Image (Photo credits: Unsplash.com)

भिवंडी (Bhiwandi) येथे एका रुग्णालयात जखमी झालेल्या तरुणाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. यामुळे तरुणाच्या नातेवाईकांनी अतिदक्षता विभागाकडे गर्दी केल्याने त्यांना तेथून जाण्यास डॉक्टरांनी सांगितले. परंतु डॉक्टरांनी अतिदक्षता विभागाच्या बाहेर जाण्यास सांगितल्याने संताप व्यक्त करत तरुणाच्या नातेवाईकांनी त्याच्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुस्तफा खान असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुस्तफा याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. काही वेळानंतर त्याचे अन्य नातेवाईक त्याला पाहण्यासाठी तेथे पोहचले. परंतु नातेवाईकांची वाढती गर्दी पाहून डॉक्टरांनी त्यांना तेथून लांब उभे राहण्यास सांगितले. परंतु डॉक्टर असे कसे बोलू शकतो असे म्हणत संतापलेल्या नातेवाईकांची डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसोबत प्रथम वाद झाले. दोन गटात झालेला वाद चिघळून नातेवाईकांनी त्यांना मारहाण केली.(मुंबई: नग्न फोटो दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 21 वर्षीय तरुणाला झाली 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा)

या प्रकरणी नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मारहाण केल्याची घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचसोबत एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे.