भिवंडी रेल्वे परिसरात विवाहित महिलेवर चार नराधमांकडून सामूहिक बलात्कार, पोलिसांकडून आरोपींना अटक
यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रेल्वे परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता उद्भवला आहे.
मुंबईत सध्या बलात्काराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहत आहे. यावर अद्याप काही तोडगा निघाला नसून महिलांकडून या प्रकारावर वेळोवेळी संताप व्यक्त केला जात आहे. तर भिवंडी (Bhiwandi) येथे रेल्वे परिसरातील झाडाझुडपात एका विवाहित महिलेवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रेल्वे परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता उद्भवला आहे. तर पीडित महिलेवर बलात्कार करण्यात आलेल्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित विवाहित महिलेला तिच्या दिराने फसवून तिला रेल्वे स्थानकाजवळील झाडाझुडपाच्या परिसरात आणले. त्या ठिकाणी दिराने तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. परंतु महिलेने या प्रकरावर आरडाओरड सुरु केली असता झाडाझुडपाच्या जवळच नशा करत असलेले तीन जण तेथे आले. या तिघांनी महिलेचे सुटका करण्याऐवजी तिच्यावर बलात्कार केला.(कामोठे मध्ये दुहेरी हत्याकांड; कौटुंबिक वादात दिराने केली वहिनी आणि पुतण्याची निर्घृण हत्या)
परंतु महिलेने या चार नराधमांच्या तावडीतून स्वत:ला कसेबसे वाचवत पोलीस स्थानकात पोहली. तसेच महिलेने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून 17 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.