Bhima Koregaon Case: रोना विल्सन यांच्या लॅपटॉप मधील नरेंद्र मोदी यांच्या हत्येचं 'ते' पत्र प्लांट, अमेरिकन कंपनीचा दावा

आर्सेनल कन्सल्टींग ही अमेरिकेची डिजिटल फॉरेन्सिक विषयांवर काम करणारी कंपनी आह. या कंपनीला आपल्या संशोधनात आढळून आले की, सामाजिक कार्यकर्ता रोना विल्सन यांच्या अटकेपूर्वी काही हॅकर्स आणि अॅटेकर्सनी हे पत्र त्यांच्या लॅपटॉपमध्ये मालवेयरच्या माध्यमातून एक पत्र सेव केले.

Rona Wilson | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भीमा कोरेगाव हिंसाचार (Bhima Koregaon Case ) प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच इंग्रजी वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने एक खळबळजनक वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, भीमा कोरेगाव प्रकरणात अटक झालेल्या सामाजिक कार्यकर्ते, बुद्धीजिवी याच्या विरोधात वापरण्यात येणारे पुरावे हे मालवेयरच्या (Malware Used) सहाय्याने लॅपटॉपमध्ये प्लांट करण्यात आले होते. आर्सेनल कन्सल्टींग (Arsenal Consulting) या अमेरिकन कंपनीच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. पुढे हा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

आर्सेनल कन्सल्टींग ही अमेरिकेची डिजिटल फॉरेन्सिक कंपनी

आर्सेनल कन्सल्टींग ही अमेरिकेची डिजिटल फॉरेन्सिक विषयांवर काम करणारी कंपनी आह. या कंपनीला आपल्या संशोधनात आढळून आले की, सामाजिक कार्यकर्ता रोना विल्सन यांच्या अटकेपूर्वी काही हॅकर्स आणि अॅटेकर्सनी हे पत्र त्यांच्या लॅपटॉपमध्ये मालवेयरच्या माध्यमातून एक पत्र सेव केले. इतकेच नव्हे तर आणखी एशी 10 डॉक्युमेंट हिडेन फाईल बनवून सेव्ह करण्यात आली. (हेही वाचा, Whatsapp Privacy: जाणून घ्या आनंद तेलतुंबडे, बेला भाटिया, रवीन्द्रनाथ भल्ला, शालिनी गेडा आणि इतरांबद्दल ज्यांचे स्मार्टफोन Spyware Pegasus वापरुन करण्यात आले टॅप)

भीमा कोरेगाव प्रकणात चार्जशीट दाखल

पोलिसांनी पुढे हा लॅपटॉप जप्त केला तेव्हा यात मिळालेली ही डॉक्यूमेंट्स भीमा कोरेगाव प्रकणात चार्जशीट दाखल करताना प्राथमिक पूरावा म्हणून वापरण्यात आली. दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, लॅपटॉपमध्ये घुसखोरी करणाऱ्या हॅकर्सबाबत माहिती मिळू शकली नाही. परंतू, ही बाब पुढे आली आहे की, केवळ रोना विल्सनच नव्हे तर इतरही काही लोक हॅकर्सची शिकार बणले आहेत. अॅटेकर्सनी सर्वर आणि आयपी अॅड्रेस इतर आरोपींपर्यंत पोहोचवले होते. हे सर्व 4 वर्षे होत राहिले. भारतातील इतरही काही हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपींना अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले. (हेही वाचा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी हे अप्स करा अपडेट, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान)

रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये हॅकर्सद्वारे घुसखोरी

प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये हॅकर्सद्वारे सुमारे 22 महिने घुसखोरी होत होती. हॅकर्सचा पहिला उद्देश होता की लॅपटॉप सर्विलान्स केला जावा आणि त्यात काही डॉक्यूमेंट्स सेव्ह करावीत.

आर्सेनल कंपनीला कसा मिळाला लॅपटॉप?

रोना विल्सन यांच्या वकिलांनीच्या युक्तीवादावर लॅपटॉपची इलेक्टॅॉनिक कॉपी कंपनीला मिळाली. ज्यामुळे अर्सेनल कंपनीने लॅपटॉपची चौकशी केली. रोना विल्सनने मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी दाखल केलेल्या याचिकेत हा अहवाल जोडण्यात आला आहे. विल्सन यांच्या वकिलाद्वारे अर्ज करण्यात आला आहे की त्यांच्या क्लाइंड विरोधातील प्रकरण रद्द करण्यात यावे. सुदीप पासबोला यांनी वॉशिंग्टन पोस्टला प्रतिक्रिया देताना सांगितले की, अर्सेनल च्या अहवालामुळे स्पष्ट झाले आहे की, त्यांचा आशिल निर्दोष आहे.

काय आहे भीमा कोरेगाव प्रकरण?

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कट रचने आणि नक्षलवाद्यांशी संबंध अशा अनेक आरोपांखाली पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांना अटक केली. यात गौतम नवलखा, वारवारा राव, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वर्नोन गोन्साल्विस यांना अटक केली. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2017 या दिवशी पुणे येथे एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या सभेत अनेकांनी भडकावू भाषणं केली होती. ज्यामुळे दुसऱ्या दिवशी (1 जानेवारी 2018) भीमा कोरेगाव विजय स्तंभाजवळ हिंसा भडकली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now