Bhima Koregaon Battle Anniversary: कोरेगाव भीमा शौर्यदिन पार्श्वभूमीवर पुण्यात कलम 144 लागू, वाहतूक मार्गात बदल
30 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 2 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत कडक नियमावली लागू असणार आहे.
यंदा 204 वा कोरेगाव भीमा शौर्यदिन (Bhima Koregaon Battle Anniversary) आहे. पेशव्यांविरूद्ध 'जातिवादा'विरूद्ध दलित समाजाने पुकारलेल्या ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ 1 जानेवारी दिवशी पुण्यात मोठी गर्दी असते. पण ओमिक्रॉनची (Omicron) वाढती दहशत पाहता आता पुण्यामध्येही कलम 144 लागू करण्यात आले आहे. 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 2 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत कडक नियमावली लागू असणार आहे. पुणे शहर पोलिस दलाकडून या दिवशी 5 हजार पोलिसांची कुमक तैनात ठेवण्यात आली आहे.
आंबेडकर अनुयायी लोकं दरवर्षी 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथील जयस्तंभाला वंदन करण्यासाठी पुण्यामध्ये एकत्र जमतात. पण यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पुणे जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या नियमावलीनुसार सोशल मीडीयात अफवा पसरवणारा, द्वेष निर्माण करणारा तसेच दिशाभूल करणारा मजकूर शेअर, पोस्ट करण्यावर बंदी असेल. सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर लावण्यासही मनाई आहे. हे देखील नक्की वाचा: Bhima-Koregaon Anniversary: काय आहे भीमा-कोरेगाव विजयस्तंभाचा इतिहास? नेमकं काय घडलं होतं 1 जानेवारी 1818 रोजी? जाणून घ्या.
कलम 144 लागू
जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम वाहतुकीतील बदल
दरम्यान कोरेगाव भीमा शौर्यदिन निमित्त अनुचित प्रकार रोखण्यासाठी अनेक वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, महात्मा गांधी रस्ता 1 जानेवारीच्या पहाटे 5 वाजेपर्यंत नो-व्हेईकल झोन असणार आहे. काही मार्गांवर नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नववर्षाच्या दिवशी पुण्यात फिरण्याचा प्लॅन करणार्यांनी ट्राफिकमधील बदल लक्षात घेऊन बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आले आहे.