Bhendwal Bhavishyavani 2019: 300 वर्ष जुन्या 'भेंडवळ भविष्यवाणी' बद्दल इंटरेस्टिंग गोष्टी

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामधील 'भेंडवळ' या गावामध्ये अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी घटमांडणी केली जाते.

Bhendwal (Photo Credits: Commons.Wikimedia)

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस काहींसाठी शुभ कार्याची सुरूवात, काहींसाठी सोने खरेदीसाठी पण बुलढाणासह (Buldhana) महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी अक्षय्य तृतीयेची संध्याकाळ 'भेंडवळ भविष्यवाणी' (Bhendwal Bhavishyavani) साठी खास असते. अक्षय्य तृतीयेच्या दुसर्‍या दिवशी भेंडवळ भविष्यवाणीचा अंदाज जाहीर केला जातो. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा या प्रथेवर विश्वास असला तरीही अंधश्रद्धा निर्मुलन समिती सह अनेक पुरोगामी विचाराचे लोकं 'भेंडवळ भविष्यवाणी'चं समर्थन करत नाहीत. त्यांच्यामते भेंडवळ भविष्यवाणीला शास्त्रीय आधार नाही त्यामुळे हे केवळ भाकित असल्याचं म्हटलं आहे. Bhendwal Bhavishyavani 2019: 'भेंडवळ घटमांडणी' चा अंदाज जाहीर; पावसाची स्थिती सर्वसाधारण तर देशात सत्ता स्थिर राहणार असल्याचे भाकीत

'भेंडवळ भविष्यवाणी' बद्दल खास गोष्टी 

भेंडवळ घटमांडणी

अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी शेतामध्ये घटमांडणी केली जाते. त्यामध्ये सात फूट व्यासाचा घट वापरला जातो. घटाच्या मध्यभागी दोन फूट व्यासाचा खड्डा करून त्यामध्ये मातीचे 4 ढेकळे ठेवले जातात. चार ढेकळे पावसाच्या चार महिन्यांचे प्रतीक आहेत. त्यावर पाण्याने भरलेला करवा म्हणजे मातीचे भांडे ठेवले जाते.

करव्यावर वडा, भजे, करंजी, पुरी, सांडोळी, कुरडी, पापड, पानविडा, सुपारी मांडली जाते. तर गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडई यासह 18 प्रकारच्या धान्याची व खाद्य पदार्थांची प्रतिकात्मक मांडणी केली जाते.

प्रतिकात्मक चिन्ह काय सांगतात?

विदर्भ, खानदेशासह अनेक शेतकर्‍यांचे या 'भेंडवळ भविष्यवाणी'कडे लक्ष लागलेले असते. शेतकरी अक्षय्य तृतीयेच्या रात्री या शेताजवळ गर्दी करतात. भाकीत जाहीर केल्यानंतर त्यानुसार पुढील पेरणीची आखणी करतात.

आजपर्यंत वर्तवण्यात आलेल्या भविष्यवाणीनुसार 70-75% भाकित खरं ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हा केवळ अंदाज असतो यामध्ये कोणतेच वैज्ञानिक आधार नाहीत.