Funeral On a Pet Cat: पाळीव मांजरावर नागरी स्मशनभूमीत अंत्यसंस्कार, सहा जणांवर गुन्हा दाखल
मीरा भाईंदर महापालिका (MBMC) हद्दीतील नागरी स्मशानभूमीत (Civic Crematorium) कथित बेकायदेशीर अंत्यसंस्काराचे (Funeral On a Pet Cat) प्रकरण समोर आले आहे. येथील नागरी स्मशानभूमीत पाळीव मांजरावर (Pet Cat) अंत्यसंस्कार केल्याची कधीत घटना घडली आहे.
मीरा भाईंदर महापालिका (MBMC) हद्दीतील नागरी स्मशानभूमीत (Civic Crematorium) कथित बेकायदेशीर अंत्यसंस्काराचे (Funeral On a Pet Cat) प्रकरण समोर आले आहे. येथील नागरी स्मशानभूमीत पाळीव मांजरावर (Pet Cat) अंत्यसंस्कार केल्याची कधीत घटना घडली आहे. भाईंदर पोलिसांनी (Bhayander Police) तातडीने दखल घेत या प्रकरणा सहा जणांवर गुन्हे दाखल केल्याचे समजते. या सहा जणांमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या (MBMC) चार कंत्राटी कर्मचाऱ्यांसह जनावरांसाठी खाजगी दफन आणि अंत्यसंस्कार सेवा चालवणाऱ्या दाम्पत्याचा समावेश आहे. या सर्वांवर दफनभूमीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी आयपीसी कलम 297 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नाही.
मांजरीवरील अंत्यसंस्काराची नोंदवहीत नोंदच नाही
पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, भाईंदर (पश्चिम) येथील अंबिका पार्कमध्ये ‘पेट हेव्हन्स डॉग, मांजर दफन आणि अंत्यसंस्कार सेवा’ चालवणाऱ्या जितेश पटेल (44) आणि त्यांची पत्नी पारुल (42) या जोडप्याने भाईंदर (पश्चिम) येथील आंबेडकर नगर परिसरातील नागरी स्मशानभूमीत मांजराचे शव कथीतरित्या आणले. ही घटना 22 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 ते 8 च्या दरम्यान घडली. स्मशानभूमीत येणाऱ्या मानवी मृतदेहांची नोंद ठेवण्याचे आणि चिता व परिसर स्वच्छ करण्याच्या जबाबदारीसाठी कंत्राटी पद्धतीने काम करणारे बबन टुले (55), हनुमान चव्हाण (24), मिराज अली (47) आणि नीलेश पाटील (45) या चौघांनी या जोडप्यास मदतक केली. धक्कादायक म्हणजे हे चारही कर्मचारी पाळीने (शिप्ट) काम करतात. पण, चौघांच्या कामाच्या कालावधीत या मांजरीच्या अंत्यंस्काराबाबत कोणतीही नोंद रजिस्टरमध्ये करण्यात आली नाही. (हेही वाचा, World's Richest Pet: 800 कोटींची मालक आहे ही मांजर; जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीत Olivia Benson चा लागतो तिसरा क्रमांक)
मांजराचा मृतदेह चितेवर
धक्कादायक म्हणजे, आरोपींनी मांजराचा मृतदेह चितेवर ठेवला होता. तसेच, मानवी मृतदेहावर ज्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात त्याच पद्धतीने त्यांनी मांजरावर ही अंत्यसंस्कार केले. घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंत्यसंस्काराचा व्हिडिओ व्हायरल झाला झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. व्हिडिओची सत्यता पडताळल्यानंतर नागरी प्रशासनाने बुधवारी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Cat News & Pune Crime : मांजर मेल्याचा राग, मालकाकडून पशुवैद्यकीय डॉक्टरला मारहाण, पायाला फ्रॅक्चर)
मांजराच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मालकाकडून पैसे
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या पाळीव मांजरावर अंत्यसंस्कार झाले. त्या मांजराच्या मालकाने त्याच्या (मांजराच्या) मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सेवा प्रदात्यांना (जोडप्यास) पैसे दिले होते. जोडप्याने पैसे मिळाल्याने मांजर सोबत घेतले. मात्र, त्याचे अंत्यसंस्कार होणार की, इतर ठिकाणी विल्हेवाट लावणार याबाबत कोणतीही कल्पना त्यांना देण्यात आली नव्हती. पाळीव प्राण्यांच्या मालकांची ओळख उघड करण्यात आली नाही. (हेही वाचा, मांजरीमुळे महिला गरोदर? बायको प्रेग्नंट झाली म्हणून नवऱ्याने त्याच्या Ginger Tom ला ठरवले दोषी, वाचा नक्की काय आहे प्रकरण)
दरम्यान, पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी या सारख्याच इतरही काही गुन्ह्यांमध्ये गुंतले आहेत काय? याबाबत पोलीस तपास करत आहेत. मीरा-भाईंदरमध्ये पाळीव प्राण्यांसाठी दफनभूमीसाठी नेमून दिलेली जागा नसल्यामुळे, प्राणीप्रेमी अनेकदा मुंबईच्या परळ येथील एसपीसीएमध्ये अंतिम संस्कारासाठी जातात. काही लोक रात्रीच्या वेळी त्यांच्या पाळीव प्राण्यांना मोकळ्या जागेत पुरतात, तर काहीजण दहिसरमधील प्राण्यांसाठी इलेक्ट्रिक मोबाइल स्मशानभूमीचा वापर करतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)