पुण्यात ACB ने Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College च्या डीन ला 10 लाखांची लाच घेताना पकडलं रंगेहाथ
8 ऑगस्ट दिवशी 10 लाखांचा पहिला इन्स्टॉलमेंट देताना त्यांना ACB ने रंगेहाथ पकडलं.
अॅन्टी करप्शन ब्युरो (anti-corruption bureau) कडून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकला कॉलेजच्या ( Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College) डीन ला 10 लाखांची लाच घेताना पकडलं आहे. एका एमबीबीएस च्या सीट साठी त्यांनी ही लाच घेतल्याचं मंगळवारी (8 ऑगस्ट) अधिकार्यांनी सांगितलं आहे. तपास अधिकार्याच्या माहितीनुसार, Ashish Shrinath Banginwar (वय वर्ष 54) यांनी तक्रारदाराच्या मुलाच्या प्रवेशासाठी 16 लाखांची मागणी केली होती. Shailaja Darade Arrest: महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक .
तक्रारीनुसार, तक्रारदाराचा मुलगा National Eligibility cum Entrance Test (NEET) 2023 परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याला पुण्याचं भारतरत्न भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज कॅपच्या पहिल्या राऊंड मध्ये लागलं होतं. जेव्हा तक्रारदार प्रवेशासाठी गेले तेव्हा 22.50 लाख वार्षिक फी च्या वर त्याच्याकडे 16 लाखांची मागणी केली.
ACB च्या सुरूवातीच्या तपासामध्ये जेव्हा डीन लाच घेण्यास तयार झाले तेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी जाळं टाकण्यात आलं. 8 ऑगस्ट दिवशी 10 लाखांचा पहिला इन्स्टॉलमेंट देताना त्यांना ACB ने रंगेहाथ पकडलं. समर्थ पोलिस स्टेशन मध्ये एसीबी ने या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2023 09:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

