Bhandara Crime News: संपत्तीच्या वादातून बापाकडून पोटच्या पोराची निर्घृण हत्या; भंडाऱ्यातील घटना
त्याचा मोठा मुलगा एकनाथ हा पाटबंधारे विभागात कार्यरत होता. तर लहान मुलगा हा मुंबईला नोकरीवर आहे.
निर्माण झाला. या वादातून बापानं चक्क पोटच्या मुलावर कुऱ्हाडीनं वार करून त्याची निर्घृण हत्या (Crime News) केलीय. ही थरारक घटना भंडारा (Bhandara Crime) जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या रोंघा या गावात दुपारच्या सुमारास घडली. एकनाथ ठाकरे (वय 40 वर्ष) असं मृतकाचं नाव आहे. तर, धनराज ठाकरे (वय 70 वर्ष) असं मारेकरी संशयित आरोपी बापाचं नाव आहे. गेल्याकाही दिवसांपासून बाप- लेकांमध्ये संपत्तीचा वाद होता. आज दुपारी पुन्हा एकदा याच वादातून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. वाद इतका विकोपाला गेल्यानं वडिलांनी रागातून कुऱ्हाडीच्या सहाय्यानं मुलाची हत्या केली. (हेही वाचा - Pune Cyber Fraud Cases: पुण्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ; या वर्षी जानेवारी-जुलै दरम्यान समोर आली 850 प्रकरणे, 198.45 कोटींचे नुकसान)
भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा येथे संशयित आरोपी धनराज ठाकरे हे शेतीचे काम करीत होते. त्याचा मोठा मुलगा एकनाथ हा पाटबंधारे विभागात कार्यरत होता. तर लहान मुलगा हा मुंबईला नोकरीवर आहे. आज धनराज आणि एकनाथ यांच्यात जमीनीच्या वादावरुन पुन्हा एकदा वाद झाला. हा शाब्दिक वाद विकोपाला गेला आणि वडीलाने घरातील कुर्हाडीने मुलाच्या मानेवर वार करुन त्याची हत्या केली.
दरम्यान गावकर्यांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यांनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या बाबतची माहिती गोबरवाही पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच गोबरवाही ठाण्याचे ठाणेदार विनोद गिरी आणि आंधळगाव ठाण्याचे ठाणेदार पोनि सोनवाने, हे घटनास्थळावर दाखल झाले. या प्रकरणाची पुढील कायदेशीर कारवाई सध्या सुरू आहे.