Bhaiyyuji Maharaj Suicide Case: अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेलींग, दबावाला कंटाळून भय्यू महाराज यांची आत्महत्या; औषधांच्या नशेत सुसाईड नोट लिहिल्याचा पोलिसांना संशय
यात सुमारे 125 लोकांची चौकशी आणि 28 जबाब नोंदविण्यात आले आहेत. तर, 12 साक्षीदारांचे जबाब दोनहून अधिक वेळा तपासण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
Bhaiyyuji Maharaj Suicide Case: भय्यू महाराज (Bhaiyyuji Maharaj) आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयाकडे सोमवारी एक आरोपपत्र सादर केले. या आरोपपत्रात महाराजांचा सेवक विनायक दुधाळे (Vinayak Sevadar), शरद देशमुख (Sharad Sevadar) आणि पलक पुराणिक (Palak Puranik) यांनी केलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच महाराजांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. या तिघाही जणांवर आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणे, खंडणी आणि संपत्त हडप करण्याचा कट रचण्याचा आरोप आहे. आझाद नगर सीएसपी सुरेंद्र सिंह तोमर यांनी न्यायालयाला 366 पानांचे आरोपपत्र सादर केले. यात सुमारे 125 लोकांची चौकशी आणि 28 जबाब नोंदविण्यात आले आहेत. तर, 12 साक्षीदारांचे जबाब दोनहून अधिक वेळा तपासण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
भय्यू महाराज यांना सेवकांकडून औषधांचा अतिरिक्त डोस
पोलिसांनी भय्यू महाराज यांची निकटवर्तीय बनलेली पलक पुराणिक हिच्या मोबाईलमधून झालेले चॅट. तसेच सेवक विनायक, शरद आणि पलक या तिघांमध्ये झालेले मोबाईल चॅट तपासले. या चॅटमधून महाराजांची संपत्ती हडप करण्याचा कट हे तिघेही गेली तिन वर्षे रचत असल्याचे पुढे आले आहे. पलक, विनायक आणि शरद महाराजांना डिप्रेशनचा आजार झाल्यानंतर डॉक्टरांनी दिलेली औषधे अधिक मात्रेत देत. डॉक्टरांनी भय्यू महाराज यांना जोल प्रेस नावाचे एक औषध दिले होते. हे औषध डॉक्टरांना तीन पटींनी अधिक मात्रेत देत असे. या औषधांमुळे महाराज सलग तीन दिवस नशेत आणि झोपेच्या अधिन असत.
औषधांच्या अंमलामुळे नशेत असलेल्या भय्यू महाराज यांच्यासोबत अश्लिल फटोग्राफी
अधिक मात्रेत औषध घेतल्याने औषधांच्या अंमलाखाली असलेल्या महाराजांचे आणि पलक हिचे काही अश्लिल फोटो काढण्यात आले. या फोटोंच्या माध्यमातून महाराजांना ब्लॅकमल करण्यात आले. पुढे हे ब्लॅकमेलींग अधिकच प्रमाणात वाढले. त्यामुळे महाराज मानसिक दृष्ट्या खचले. पोलिसांनी आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, महाराजांनी जी सुसाईड नोट सेवक विनायक याच्या नावाने लिहील होती तीसुद्धा औषधांच्या नशेच्या अंमलाखालीच लिहीली होती. ही सुसाईड नोटसुद्धा महाराजांच्या सेवकांनी त्यांच्या आत्महत्येपुर्वी लिहिलेले षडयंत्रच असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पलक पुराणिक हिच्याकडून भय्यू महाराज यांच्यासोबत अश्लिल व्हिडिओ
पलक हिने भय्यू महाराजांसोबत अश्लील व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून ती त्यांना ब्लॅकमेल करत असे. दरम्यानच्या काळात महाराजांचा विवाह आयुषी हिच्यासोबत 17 एप्रिल 2017 मध्ये झाला. पलक हिने भय्यू महाराज यांना विवाह करण्यासाठी दबाव टाकला. जर तुम्ही विवाह केला नाही तर, आपली अवस्था शनि (दाती) महाराजांसारखी करेन अशी धमकी दिली. विवाहाच्या निर्णयावेळी महाराजांच्या कुटुंबीयांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते हट्टाला पेटले होते. (हेही वचाा, भैय्यू महाराज यांची हत्या झाल्याचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा संशय; सीबीआय चौकशीची मागणी)
विवाहासाठी भय्यू महाराज यांच्यावर दबाव
पलक ही महाराजांसोबत दोन वर्षांपेक्षा अधिक काळ संपर्कात होती. ती महाराजांसोबत विवाह करु इच्छित होती. परंतू, महाराजांचा विवाह डॉ. आयुषी हिच्यासोबत झाला. महाराजांच्या विवाहावेळीही पलक हिने बराच गोंधळ घातला होता. तसेच, 16 जूनपर्यंत तिने त्यांना विवाह करण्यासाठी वेळ दिला होता. या व्हिडिओतही विनायक , शरद ही मंडळी पाहायला मिळतात.
भय्यू महाराज यांची सपत्ती हडपण्यासाठी सेवकांनी रचला कट
11 जून 2018 ला भय्यू महाराजांचे मीत्र दाती महाराज यांच्यावर त्यांच्या शिष्येने गैरवर्तनाचा ओरप केला होता. भय्यू महाराज यांच्यावर दबाव बनविण्यासाठी विनायक आणि शरद यांनी पलक आणि त्यांच्यात (महाराज) झालेली चॅटींग आणि कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून संग्रहित करण्यात आले होते. महाराजांच्या विवाहानंतर पलक आणि विनायक महाराजांकडून प्रतिमहिना दिड लाख रुपये वसूल करत होते. महाराजांकडून तिघांनी मिळून एक कोटी पेक्षाही अधिक रुपयांची रक्कम उकळली होती. तिघांनी मिळून पूर्ण आश्रम, महाराजांची संपत्ती आणि दान म्हणून आलेल्या वस्तू, रक्कम याचाही लेखाजोखा स्वत:कडे घेतला होता.
भय्यू महाराजांच्या कुटुंबीयांच्या जबाबामुळे संशय बळावला
भय्यू महाराज यांची पत्नी आयुषी आणि दोन्ही पहिनींनी पोलिसांना दिलेल्या जबाबत म्हटले की, पलक हिने घराच्या चाव्या हातात घेतल्या होत्या. विनायक आयुषीहिला भय्यू महाराजांना भेटूही देत नव्हता. जेव्हा पलक हिला नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला तेव्हा तिने 2017 मध्ये नोकरी सोडली. मात्र, जाताना ती तिजोरीच्या चाव्या सोबत घेऊन गेली.
भय्यू महाराज यांची मुलगी असल्याचे सांगायची पलक पुराणिक
पोलिसांच्या माहितीनुसार, मोबाईल डेटामधून मिळालेल्या माहितीनुसार, पलक ही आश्रम आणि बाहेरील लोकांना आपण महाराजांची मुलगी असल्याचे सांगत असे. मात्र, त्यानंतर ती प्रेयसीच्या रुपाने महाराजांना फोनवरुन संपर्क करत असे. पलक हिने आपल्या बहिणीच्या लग्नात महाराजांकडून आठ लाख रुपये घेतले होते. इतकेच नव्हे तर, पलक हिने महाराजांकडून लाखो रुपये किमतीची ज्वेलरी, महागडे मोबाील आणि हिरेही घेतले होते. विवाहावेळी भय्यू महाराजांनी मुलीसाठी 12 हजार रुपयांचा तर, पलक हिच्यासाठी तब्बल 48 हजार रुपयांचा लेहंगा खरेदी केला होता. पलक ही आपल्या बहिणीच्या नवऱ्यासोबत व्यवसाय सुरु करु इच्छित होती.
...अखेर भय्यू महाराजांनी आत्महत्या केली
12 जून 2018 मध्ये सिल्वर स्प्रिंग येथील घरात मुलगी कुहू हिच्या खोलीत जाऊन आपल्या परवाना असलेल्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती.