इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलन करताना बैलगाडीवरुन पडलेल्या काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवणाऱ्या भाजपला भाई जगताप यांचं प्रत्युत्तर (View Tweet)
याला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
इंधनदरवाढी विरुद्ध काँग्रेस (Congress) राज्यभर आंदोलन करत आहे. काल देखील मुंबईत (Mumbai) काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बैलगाडीवरुन मोर्चा काढण्यात आला. मात्र नेते, कार्यकर्त्यांसोबत बैलगाडी कोसळल्याने भाजपकडून काँग्रेसची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. याला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. माझ्या पडण्याच्या व्हिडिओ इतकी उत्सुकता भाजप नेत्यांनी इतर सेवेसाठी दाखवली असती तर देशाची स्थिती अशी झाली नसती, अशा शब्दांत त्यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.
भाई जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "माझ्या पडण्याच्या व्हिडिओसाठी इतके उत्सुक असलेले सर्व भाजप नेते, जर ते देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी तितकेच उत्सुक असते तर! आज देशाची स्थिती अशी झाली नसती…."
भाई जगताप ट्विट:
दरम्यान, इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी भाई जगताप आणि काँग्रेसचे इतर नेते बैलगाडीतून आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र भार सहन न झाल्याने बैलगाडी कोसळली आणि भाई जगताप यांच्यासह गाडीतील सर्व नेते व कार्यकर्ते खाली पडले. या घटनेनंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर एकच निशाणा साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवली होती.