Bhagirath Bharat Bhalke: भगिरथ भारत भालके यांची श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी निवड, शरद पवार यांचा शब्द ठरला अंतिम
भगिरत यांची कारकाना चेअरमन पदावर निवड करुन भारत भालके यांना अनोखी श्रद्धांचली वाहील्याची भावना संचालक मंडळातील काही संचालकांनी व्यक्त केली.
पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना (Shri Vitthal Sahakari Sakhar Karkhana Limited) चेअरमन पदावर भगिरथ भारत भालके (Bhagirath Bharat Bhalke) यांची निवड झाली आहे. भगिरथ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके (Bharat Bhalake) सुपूत्र आहेत. भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या आगोदर भारत भालके या कारखान्याच्या चेअरमन पदावर होते. मात्र, कोरोना संसर्गाने त्यांचे निधन झाले. तेव्हापासून चेअरमन पदाची जागा रिक्त होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा शब्द भगिरत यांच्या निवडीसाठी अंतिम ठरला.
भगिरत भालके यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. भगिरत यांची कारकाना चेअरमन पदावर निवड करुन भारत भालके यांना अनोखी श्रद्धांचली वाहील्याची भावना संचालक मंडळातील काही संचालकांनी व्यक्त केली. साह्ययक निंबळक एम. एस. तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडली. काही संचालकांनी भगिरत भालके यांच्या रुपात कारखान्याला तरुण नेतृत्व मिळाल्याचीही भावना व्यक्त केली.
भारत भालके यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर पाठिमागील दोन दिवसांपूर्वीच शरत पवार यांनी भालके कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केेल होते. भालके कुटुंबीयांना भेटण्यासाठी पवार हे भालके यांच्या सारकोली या गावी गेले होते.
दरम्यान, भारत भालके यांच्या निधनानंर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कोणता उमेदवार देणार याबाबत उत्सुकता आहे. सोलापूर दौऱ्यावेळी शरद पवार हे संभाव्य उमेदवाराचे नाव घोषीत करतील किंवा त्याबाबत काही संकेत देतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतू, शरद पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीनुसार कोणतेही भाष्य करणे टाळले. परंतू, पक्षातील सर्व जुण्या जाणत्या नेत्यांनी आणि तरुण नेतृत्वाने एकत्र येत काम करावे असे अवाहन केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता वाढली आहे. परंतू, भगिरथ भालके यांनाच विधानसभेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे.