BEST Bus Strike मिटला, आज संध्याकाळपासून 'बेस्ट बस' मुंबईच्या रस्त्यांवर धावणार
आज संध्याकाळपासून मुंबईत धावणार बेस्ट बस धावणार असल्याने सामान्य मुंबईकरांची परवड थांबणार आहे.
मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट बसचा संप (BEST Bus Strike) अखेर 9व्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायलयाच्या हस्तक्षेपानंतर बेस्ट कर्मचारी आणि बेस्ट कृती समितीने संप मागे घेत आज संध्याकाळपासून मुंबईच्या रस्स्त्यांवर बेस्ट (BEST Bus) धावणार आहे. श्रमिक कामगार संघटनेच्या कार्यालयामध्ये हा निर्णय घेतला गेला आहे.
मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेला संप हा वेतनवाढसोबत अनेक प्रलंबित मागण्यांसाठी होता. संपाच्या पहिल्याच रात्री शिवसेनेच्या कर्मचारी संघटनेने काढता पाय घेतला होता. मात्र बेस्ट बस मुंबईच्या रस्स्त्यांवर धावत नव्हती त्यामुळे मुंबईत प्रवास करताना सामान्य मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत होता. BEST Strike: एक तासाच्या आत संप मागे घ्या,बेस्ट कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; कामगारांना 10 टप्प्यातील वेतनवाढ लागू करण्याचे प्रशासनाला निर्देश
बेस्ट कर्मचारी संघटनेचे प्रमुख शशांक राव यांनी वडाळा आगारामध्ये आज कर्मचार्यांचा मेळावा आयोजित केला आहे. शशांक राव येथे कोर्टात अहवालात काय सांगण्यात आले आहे याची माहिती कर्मचार्यांना सांगणार आहेत.