बसचे निश्चित ठिकाण कळणार आता मोबाईलच्या एका क्लिकवर, बेस्ट लवकरच लाँच करणार अॅप
शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी नुकतेच ट्विट करुन ही माहिती दिली.
एम इंडिकेटर (M-Indicator) अॅपमुळे जशी रेल्वेच्या वेळापत्रकाची इत्यंभुत माहिती आपल्याला मिळतेय तशीच बसची माहिती देणारा नवीन अॅप लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. ज्याच्या माध्यमातून आपल्याला प्रवासादरम्यान किंवा बसने प्रवास करायचा असेल तर आपल्याला बसचे निश्चित स्थळ कळणार आहे. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी नुकतेच ट्विट करुन ही माहिती दिली. दळणवळणाचे सध्याचे सर्वात स्वस्त असे वाहन म्हणून ओळखल्या बेस्टचे हा अॅप महत्त्वाचे पाऊल ठरेल. तसेच बेस्टच्या ताफ्यात येणा-या नवीन एसी बसेस, इलेक्ट्रिक बसेस आणि स्वस्त बसेस यांसारख्या बेस्टच्या आमूलाग्र बदलांसोबत हा अॅप (Best App) महत्त्वाचा टप्पा असेल असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
त्यांनी ट्विटच्या माध्यमातून हा अॅप कशाप्रकारे कार्यरत असेल याची थोडी माहिती दिली.
आदित्य ठाकरे यांचे ट्विट:
या अॅपमुळे आता बेस्टचा प्रवास आणखीन सुखकर होईल असेही त्यांनी म्हटले आहे. ट्रॅफिक मुळे किंवा रस्त्यांवरील इतर कामांमुळे अनेकदा आपली बस कुठपर्यंत पोहोचली आहे याचा आपल्याला अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकदा आपली निश्चित बस चुकते आणि तासनतास एखाद्या मर्यादित बसची आपल्याला प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे आपल्याला ज्या बसमधून प्रवास करायचा आहे त्याची इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहचावी यासाठी प्रशासनाने काही तरी करावे अशी अनेक बस प्रवाशांची गेले कित्येक दिवसांपासूनची मागणी होती. हेही वाचा- BEST : मुंबई महापालिका 'बेस्ट'ला देणार 100 कोटी रुपयांचे अनुदान, 6 हजार बसेस भाडेतत्वावर घेण्याचा पर्याय
त्यामुळे प्रवाशांच्या सोयीनुसार ही सुविधा लवकरच सुरु होणार असून लवकरच हा अॅप आपल्या भेटीला येईल. ज्यामुळे प्रवाशांचे बरेच प्रश्न सुटतील असे बेस्टकडून सांगण्यात येत आहे.