BEST To Run Additional Night Bus Services: मुंबईमध्ये गणेशोत्सवात 7 ते 16 सप्टेंबर दरम्यान बेस्ट चालवणार अतिरिक्त रात्रीच्या बस सेवा, जाणून घ्या सविस्तर
एका अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य मार्ग आणि गंतव्य चिन्हासह या बसेस वेळेवर चालवल्या जाव्यात याची खात्री करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
BEST To Run Additional Night Bus Services: सध्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची (Ganpati Festival) धामधूम पहायला मिळत आहे. मुंबईत (Mumbai) या दहा दिवसांमध्ये भाविकांची तोबा गर्दी पाहायला मिळते. रात्री उशिरापर्यंत गणेशभक्त विविध मंडळांचे दर्शन घेत असतात. आता प्रवाशांची सोय आणि विशेषत: मध्य आणि दक्षिण मुंबईत रात्री उशिरापर्यंत असलेली वर्दळ लक्षात घेऊन बेस्टने (BEST) 7 ते 16 सप्टेंबर 2024 या कालावधीत रात्रीच्या वेळी जादा बससेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बस सेवा रात्री 10:30 ते सकाळी 6:00 दरम्यान चालतील. यामध्ये गिरगाव, लालबाग, परळ आणि चेंबूर या प्रमुख भागांसह कुलाबा ते उत्तर-पश्चिम मुंबई या मार्गांचा समावेश असेल.
या उपक्रमाची रचना उत्सवादरम्यान घराबाहेर पडणारे भाविक आणि पर्यटक या दोघांसाठी सोयी आणि सुलभता वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. एका अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य मार्ग आणि गंतव्य चिन्हासह या बसेस वेळेवर चालवल्या जाव्यात याची खात्री करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: Mumbaicha Raja 2024 First Look Out: समोर आला मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपतीचा फर्स्ट लूक, पहा फोटोज)
याव्यतिरिक्त, प्रवाशांची गर्दी कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी अधिकारी आणि निरीक्षक प्रमुख वर्दळ असणाऱ्या पॉईंट्सवर तैनात केले जातील. या विस्तारित सेवेचा उद्देश प्रवासाची परिस्थिती सुधारणे आणि गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांच्या गरजा पूर्ण करणे हा आहे. दरम्यान, मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून पारंपारिक स्वरूपात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या दहा दिवसांमध्ये भाविक शहरातील अनेक महत्वाच्या मंडळांना भेट देण्यासाठी गर्दी करतात. यामध्ये लालबागचा राजा, मुंबईचा राजा गणेशगल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी, जीएसबी गणपती, केशवजी नाईक चाळ गणपती, अंधेरीचा राजा या मंडळांचा समावेश आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)