BEST Premium Bus Service: नवरात्रीत घटस्थापनेचा मुहूर्तावर मुंबईकरांसाठी सुरू होणार BKC-Thane प्रिमियम बस सेवा!
त्याचा मुहूर्त 26 सप्टेंबर अर्थात नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना हा ठरवण्यात आला आहे.
बेस्ट (BEST) कडून मुंबईकरांना डबलडेकर ईव्ही बस पाठोपाठ आता अजून एक शानदार सेवा आणली आहे. मुंबईत पीक अव्हर्स मध्ये नोकरदारांचा प्रवास सुकार व्हावा यासाठी प्रिमियम बस सेवा (BEST Premium Bus Service) लॉन्च केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बीकेसी ते ठाणे (BKC-Thane) या मार्गावर ही प्रिमियम बस सेवा चालवली जाणार आहे. त्याचा मुहूर्त 26 सप्टेंबर अर्थात नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना हा ठरवण्यात आला आहे. हे देखील नक्की वाचा: BEST च्या अॅप मध्ये येणार 'Home Reach' फीचर; महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्याचा प्रयत्न .
प्रिमियम बस ची वैशिष्ट्य
- नोकरदार ज्या भागात अधिक प्रवास करतात तेथे पीक अव्हर्स मध्ये एसी बस सेवा.
- बसमधील आसन व्यवस्थेचं बुकिंग Chalo app द्वारा करता येणार. यामध्ये वेळ, चढण्याचा स्टॉप, उतरण्याचा स्टॉप निवडता येईल.
- प्रिमियम बस मध्ये प्रवासी उभ्याने प्रवास करणार नाहीत.
- प्रिमियम बसचे मर्यादित बस स्टॉप असतील.
- फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस तत्त्वावर प्रवासी घेतले जातील.
हे देखील नक्की वाचा: Mumbai Airport BEST Bus Services: मुंबई विमानतळ बससेवेसाठी 'बेस्ट'ने सुरु केली 'आसन आरक्षण' सेवा .
मुंबईमध्ये सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस वाहतूकीची मोठी कोंडी पहायला मिळते. अनेक खाजगी वाहनं रस्त्यावर असतात. पण आता बेस्ट कडूनच विशेष सोय केल्यास प्रवाशांचा खाजगी वाहनांकडील ओढा कमी होईल आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट्ला चालना मिळेल असे विश्वास आहे. दरम्यान बेस्टचे जनरल मॅनेजर, लोकेश चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट ही भारतातील पहिली स्टेट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे जे शहरात प्रिमियम सिटी बस सेवा सुरू करत आहेत.