BEST च्या Minibuses 20 दिवसांपासून बंद, सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल; आर्थिक अडचणींमुळे कंत्राटदाराने मिनीबस पुरवण्यास दर्शवली असमर्थता

प्राप्त माहितीनुसार, बेस्टकडे भाडेतत्त्वावर 280 वातानुकूलित मिनीबसचा ताफा होता. या बसेस मरोळ, दिंडोशी आणि ओशिवरा सारख्या प्रदेशांसह पश्चिम उपनगरांमध्ये चालवल्या जात होत्या. मात्र, कंत्राटदाराने आर्थिक अडचणीचे कारण देत 12 ऑक्टोबर रोजी या बसेसचा पुरवठा बंद केला.

BEST Minibuse (फोटो सौजन्य - फेसबुक)

BEST Minibuses: मुंबईतील अरुंद रस्त्यावर प्रवाशांना अडकून पडू नये म्हणून बेस्ट प्रशासनाने आपल्या ताफ्यात वातानुकूलित मिनी बसेस (Mini Buses) दाखल केल्या होत्या. मात्र, या मिनी बसेस अनेक दिवसांपासून बंद आहेत. आर्थिक अडचणींचा हवाला देत हंसा या कंत्राटदाराने मिनीबस पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे. जवळपास 20 दिवसांपासून या बसेस बंद असल्याने पश्चिम उपनगरातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्राप्त माहितीनुसार, बेस्टकडे भाडेतत्त्वावर 280 वातानुकूलित मिनीबसचा ताफा होता. या बसेस मरोळ, दिंडोशी आणि ओशिवरा सारख्या प्रदेशांसह पश्चिम उपनगरांमध्ये चालवल्या जात होत्या. मात्र, कंत्राटदाराने आर्थिक अडचणीचे कारण देत 12 ऑक्टोबर रोजी या बसेसचा पुरवठा बंद केला. परिणामी, प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

बेस्ट शहरात तसेच उपनगरात एकूण 3,196 बस चालवते, ज्यात वातानुकूलित डबल डेकर, सिंगल डेकर आणि नॉन-एसी सिंगल-डेकर बस, तसेच 28 आसनी मिडी बसचा समावेश आहे. यापैकी काही बस भाडेतत्त्वावरही चालवल्या जातात. मिनी बस सेवा बंद होण्यापूर्वी प्रवाशांकडून या बसेसला सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. परंतु, कंत्राटदाराने माघार घेतल्यानंतर बेस्टने कंत्राटदाराचा करार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (हेही वाचा - BEST Bus On Coastal Road: बेस्ट कडून कोस्टल रोड वर एनसीपीए ते भायखळा स्टेशन नवी एसी बससेवा सुरू; पहा मार्ग, तिकीट दर)

तथापी, मिनीबसचा पुरवठा थांबवून प्रवाशांची मोठी गैरसोय करणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई करणार, असा सवाल बेस्टच्या कामगार संघटनांनी उपस्थित केला आहे. उपनगरातील मिनी बससेवा बंद असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. (हेही वाचा - BEST Bus Catches Fire in Ghatkopar: घाटकोपरमधील गांधी नगर उड्डाणपुलावर बेस्टच्या बसला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही, व्हिडिओ पहा)

दरम्यान, बेस्टच्या ताफ्यातील बसेसची संख्या डिसेंबर 2024 अखेर 1,047 वरून 500 पर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट कामगार संघटनेने महानगरपालिकेला किमान 3337 वाहनांचा बस ताफा कायम ठेवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif