BEST Employees Strike: बेस्टच्या शेकडो बस कर्मचाऱ्यांचा संप, ऐन दिवाळीत मुंबईकरांना संपाचा फटका बसण्याची शक्यता

त्यामुळे मुंबईकरांना शहरातील प्रवासाला अडचण निर्माण होण्याचे चिन्ह आहे.

BEST Bus (Photo Credits: PTI)

गेले वर्षी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employee) एसटी महामंडळा विरुध्द संप पुकारला होता. पगारवाढीसह विविध मुद्द्यावरुन त्यांनी महामंडळा विरोधी आक्रमक झाले होते. पण यावर्षी मुंबईकरांची (Mumbai) जीवनवाहिनी बेस्टच्या (BEST Bus) कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईकरांना शहरातील प्रवासाला अडचण निर्माण होण्याचे चिन्ह आहे. तरी हा संप बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून (BEST Bus Employee Strike) पुकारण्यात आला आहे. पगारवाढीसह दिवाळीचा बोनस (Diwali Bonus) अशा विविध मागण्यासह कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तरी मुंबईतील विविध बेस्ट बस डेपो (BEST Bus Depot) पैकी फक्त सांताक्रुजमधील शेकडो कंत्राटी कर्मचारी (Contract Employees) संपावर गेल्याने पश्चिम मुंबई (Western Mumbai) भागातील नागरिकांना वाहतूकीचा फटका बसत आहे.

 

मुंबईतल्या सांताक्रूझ डेपोतील (BEST Santacruz Depot) कर्मचाऱ्यांनी आज सकाळी अचानक संप केल्यामुळे सांताक्रुज डेपोतली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याच पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून आम्ही तत्काळ कर्मचाऱ्यांच निवेदन घेऊन पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर कर्मचार्‍यांकडून आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा घेण्यात आल्याच पाहायला मिळत आहे. (हे ही वाचा:- No Bomb Threats in Mumbai: मुंबईत बॉम्बची कोणतीही धमकी नाही, शहर सुरक्षित आहे; दिवाळीपूर्वी मुंबई पोलिसांचे आश्वासन)

 

बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात आलेला नाही.  वाहकाचा पगार अठरा हजार पाचशे असून तो 12500 दिला जातो तर चालकाचा 23500 असून तो केवळ अठरा हजार दिला जातो त्यामुळे पगारात वाढ करण्यात यावी अशी मागणी बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. बेस्टमध्ये काम करत असून देखील कामावर येण्यासाठी तिकीट काढावे लागते हा प्रवास मोफत करावा, अशा विविध मागण्यांबाबत बेस्ट बस डेपोमधील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.