बीड हादरलं! शुक्रवार पेठ येथील घरात आढळला 30 वर्षीय महिलेसह 2 चिमुकल्यांचा मृतदेह; पतीला अटक

बीड (Beed) शहर पुन्हा एकदा हत्याकांडाने (Murder) हादरलं आहे. बीड मधील शुक्रवार पेठ भागात संगीता कोकणे (वय 30 वर्ष) आणि दोन लहान मुले मयूर कोकणे (वय 7) आणि संदेश कोकणे (वय 11) यांचे मृतदेह पोलिसांना त्यांच्याच राहत्या घरात आढळून आले आहेत.

Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

बीड (Beed) शहर पुन्हा एकदा हत्याकांडाने (Murder) हादरलं आहे. रविवारी म्हणेजच आज 24 मे रोजी बीड शहरातील पेठ परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. बीड मधील शुक्रवार पेठ भागात संगीता कोकणे (वय 30 वर्ष) आणि दोन लहान मुले मयूर कोकणे (वय 7) आणि संदेश कोकणे (वय 11) यांचे मृतदेह पोलिसांना त्यांच्याच राहत्या घरात आढळून आले आहेत.याबाबात कोकणे परिवाराच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासाला सुरुवात केली आहे. या हत्याकांडाचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी ही हत्या कौटुंबिक भांडणातून झाली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याच संशयातून पोलिसांनी मृत महिलेचा पती संतोष कोकणे याला अटक केली आहे. (नांदेड: उमरी मध्ये साधूचा मृतदेह आश्रमात आढळल्याने खळबळ; पोलिस तपास सुरू)

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळी म्हणजेच कोकणे कुटुंबाच्या राहत्या घरात संगीता आणि संदेश यांचे मृतदेश रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर मयूर या चिमुकल्याचा मृतदेह हा घरातील पाण्याच्या पिंपात कोंबून ठेवण्यात आला होता. मृतदेहाच्या शेजारी रक्ताने माखलेले दगड आणि बॅट पडली होती, यावरून तरी हा खून उया तिघांच्या डोक्यात दगड आणि बॅट घालून करण्यात प्राथमिक अंदाज आहे. घरातील सर्व सामान आणि कपडे रक्ताने माखलेले आणि अस्ताव्यस्त पडलेले होते.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणात पुढील तपास सुरु केला आहे मात्र अद्याप नेमका खून कोणी केला, याविषयी शेजाऱ्यांना कशी माहिती मिळाली याबाबत सविस्तर खुलासा पोलिसांनी केलेला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement