बीड: भिल्ल समाजातील कुटुंबाने गाव सोडून जाण्यास नकार दिल्याने जमावाकडून जबर मारहाण

बीड (Beed) येथे भिल्ल समाजातील (Bhill Community) एका कुटुंबाला गाव सोडून जाण्यासाठी गावकऱ्यांकडून जबरदस्ती करण्यात येत होती.

Representative Image (Photo credits: File Photo)

बीड (Beed) येथे भिल्ल समाजातील (Bhill Community) एका कुटुंबाला गाव सोडून जाण्यासाठी गावकऱ्यांकडून जबरदस्ती करण्यात येत होती. मात्र कुटुंबाने यासाठी नकार दिल्याने जमावाने त्यांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढच नाही तर कुटुंबाने पोलिसात जमावाविरुद्ध तक्रार केल्याने पुन्हा त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

पीडित कुटुंबाने स्थानिक पोलीस स्थानकात जमावाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. परंतु तक्रार का केली विचारण्यासाठी अटक केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी पीडित कुटुंबाकडे धाव घेतली. त्यावेळीसुद्धा पुन्हा एकदा नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली आहे.(त्रिपुरा: गाय चोरत असल्याच्या संशयावरुन जमावाकडून व्यक्तीला मारहाण केल्याने मृत्यू)

तर गावात भिल्ल समाजातील व्यक्ती नको म्हणून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. मात्र गाव सोडून गेल्यास राहणार कुठे अशी व्यस्था पोलिसांसमोर उपस्थित केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement