Beed News: बीडमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांची मोठी कारवाई; खामगाव चेक पोस्टव कारमधून १ कोटींची रोकड जप्त

बीडमध्ये नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी १ कोटी जप्त केले आहेत.

Maharashtra Police (Photo credit: archived, edited, representative image)

Beed News: बीड(Beed)मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाकाबंदी दरम्यान खामगाव चेक पोस्ट (Khamgaon Check Post)वर पोलिसांनी तब्बल १ कोटींची रोकड जप्त (1 crore cash seized) केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान पार पडत आहे. निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी राज्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव चेक पोस्टवर चेकींग दरम्यान एका कारमधून ही रोकड जप्त करण्यात आली. वाहनाची तपासणी करत असताना कारमध्ये लोखंडी पेटी आढळून आली. (हेही वाचा:Mumbai Crime News: भरारी पथकाची मोठी कारवाई! मध्यरात्रीत भांडूपमधून 3 कोटींचा मुद्देमाल जप्त )

पोलिसांनी कारचालकाकडे पैशांबाबत विचारपूस केली. तेव्हा कार चालकाकडे पुरेसे कागदपत्र नव्हते. चालकाने ही रक्कम द्वारकादास मंत्री बँकेची असल्याचे सांगितले. कागदपत्र नसल्याने पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली आहे.

ऐरोलीतही पोलिसांनी नुकतीच मोठी कारवाई केली होती. दीड कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने शनिवारी (ता. ४) ऐरोली खाडीपुलावर दीड कोटींची रोकड जप्त केली. दुधाच्या टेम्पोतून ही रक्कम नेली जात होती.