महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: बीड जिल्ह्यातील मतदार संघाचे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल, जाणून घ्या

बीड मतदार संघात शिवसेना वरचढ राहिली आहे. बीड विधानसभा निवडणूक अनेक उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. बीड मतदार संघात बीड, केज, गेवराई, माजलगाव, परळी आणि आष्टी अश्या 6 जागा आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चुलतभाऊ धनंजय मुंडे यांचे होमपीच परळी जागेवर दोन्ही नेत्यांचे भविष्य टिकून आहे.

Maharashtra Assembly Elections 2019 | File Image

बीड (Beed) जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा जागा आहे. बीड मतदार संघात शिवसेना (Shivsena) वरचढ राहिली आहे. सेनेचे सुरेश नवले या मतदार संघातून दोनदा आमदार झाले आहेत. यापैकी एकदा ते मंत्री सुद्धा राहिले होते. त्याच्यानंतर सुनील धांडे (Sunil Dhande) हे शिवसेनेकडून आमदार झाले होते. बीड विधानसभा मतदार संघात एकदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी (NCP) अशी लढतदेखील झाली होती. यंदा बीड विधानसभा निवडणूक अनेक उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. बीड मतदार संघात बीड, केज, गेवराई, माजलगाव, परळी आणि आष्टी अश्या 6 जागा आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चुलतभाऊ धनंजय मुंडे यांचे होमपीच परळी जागेवर दोन्ही नेत्यांचे भविष्य टिकून आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर हे 2014 आणि 2019 मध्ये आमदार म्हणून निवडून आले.

महाराष्ट्रातील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातून 77 हजार 134 मतांनी विजय मिळवला होता. पण, लक्ष्यात घेण्यासारखे म्हणजे हे की, बीड विधानसभा मतदार संघात राज्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. दुसरीकडे, या जिल्ह्यात मुस्लिम, मराठा, दलित आणि ओबीसी आणि ब्राह्मण समाजाची मतं लक्षणीय असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला या मतदार संघातून 11000 पेक्षा अधिक मतं मिळाली होती. त्यामुळे यंदा विधानसभेचे चित्र कसे असेल यावर सर्वांचे लक्ष लागून राहील.

बीड मतदारसंघ

बीड मतदार संघात शिवसेना वरचढ राहिली आहे. सेनेचे सुरेश नवले या मतदार संघातून दोनदा  यापैकी एकदा ते मंत्रीदेखील राहिले होते. त्यानंतर सुनील धांडे सेनेच्या तिकिटावर आमदार राहिले होते. बीड विधानसभेत क्षीरसागर विरुद्ध सेने अशी परंपरागत लढत पायाला मिळाली आहे. आता खुद्ध क्षीरसागर शिवसेनेत शामिल झाले आहे. विशेष म्हणजे बीड नगरपालिकेत क्षीरसागर कुटुंबाची 50 वर्षांपासूनची सत्ता राहिली आहे.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रवादी- 77,134

विनायक मेटे, भाजप- 71,002अनिल जगताप, शिवसेना- 30, 691

बीड विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

जयदत्तजी क्षीरसागर, शिवसेना

प्रशांत वासनिक, बीएसपी

वैभव काकडे, मनसे

संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीअशोक हिंगे, अपक्ष

केज विधानसभा मतदारसंघ

1962 पासून आजवर एकूण तेरावेळा या जागेवर निवडणूक घेतण्यात आली आहे. यात 5 वेळा काँग्रेस, 4 वेळा राष्ट्रवादी तर 3 वेळा भाजपने विजय मिळवला आहे. शिवाय अपक्षाने एकदा जागा जिंकली आहे. 1990-2009 वेळा या मतदार संघातून विमल मुदंडा या दोन वेळा भाजपकडून तर तीन वेळा राष्ट्रवादीकडून असे सलग ५ वेळा विजय मिळवला आहे. 2012 मध्ये मुदंडा यांचे दीर्घ  झाले. त्यामुळे, घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे हे मुदंडा गटातून केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. ही विधानसभा सीट राज्यातील महत्वाचा आणि बीड जिल्ह्यातील केज मतदार संघाती. लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आगामी केज विधानसभा मतदार संघात दुहेरी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपने नमिता मुदंडा यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे पुन्हा रिंगणात उतरले आहेत.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

संगीत ठोंबरे, भाजप- 1,06, 834

नमिता मुदंडा, राष्ट्रवादी काँग्रेस- 64,113

केज विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

नमिता मुदंडा, भाजप

परमेश्वर उदार, बीएसपी

पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी

गेवराई विधानसभा मतदार संघ

भाजप नेते लक्ष्मण माधवराव पवार हे गेवराई विधानसभा मतदार संघातून २०१४ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. येथून राष्ट्रवादीने यावेळी विजय सिंह पंडित यांना उमेदवारी दिली आहे. विजय सिंह गेवराईचे माजी मंत्री शिवाजीराव यांचे सुपुत्र आहे. येथे त्यांचा सामना भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्याशी होईल. लक्ष्मण पवार आणि विजय सिंह संबंधी आहे. विजय पंडित हे लक्ष्मण पवार यांच्या बहिणीचे मेहुणे आहेत. गेवराई येथील राजकीय लढत शिवाजीराव आणि त्यांचे चुलत भाऊ बडमराव पंडित आणि शिवाजी यांचे मोठे पुत्र अमरसिंह पंडित यांच्याभोवती फिरत होतं. 2004 मध्ये भाजपा, 2009 मध्ये राष्ट्रवादी आणि 2014 मध्ये पुन्हा गेवराई जागा भाजपने जिंकली.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

लक्ष्मण पवार, भाजप - 1,36,384

बदामराव पंडित, राष्ट्रवादी - 76,383

गेवराई विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

लक्ष्मण माधवराव पवार, भाजप

विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी

भाऊराव दुर्गादास प्रभाले, सिपीआय

सतीश कापसे, बीएसपी

माजलगाव विधानसभा मतदार संघ

उत्पादक शेतकर्‍यांचा मतदारसंघ असलेल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आरटी देशमुख यांनी राष्ट्रवादीचे निकटचे प्रतिस्पर्धी प्रकाश सोळंके दादा यांना 37,145 मतांनी पराभूत केले होते. ही जागा बीड जिल्ह्यातील सर्वात समृद्ध विधानसभा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. सोळंके यांना वगळता अन्य कोणताही उमेदवार दोनदा आमदार झाला नाही. सोळंके कुटुंबीयांची या मतदारसंघात सर्वाधिक काळ सत्ता राहिली होती. प्रकाश सोळंके 1978 मध्ये या मतदारसांघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. शिवाय, ते राज्याचे मुख्यमंत्रीदेखील राहिले होते. प्रकाश सोळंके हे या मतदार संघात तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. यातील 1999 आणि 2004मध्ये भाजपच्या तिकिटावर आणि 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

आरटी देशमुख, भाजपा - 1,12, 497

प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी कॉंग्रेस- 75,252

माजलगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

अमोल डोंगरे, बीएसपी

प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी

रमेश बाबुराव कोकाटे (आडस्कर), भाजप

शेख अमर जैनोद्दीन, एआयएमआयएम

मुस्तक मुस्तफा शेख, टिपू सुल्तान पार्टी

परळी विधानसभा मतदार संघ

यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटांवर एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. बीडची परळी विधानसभा जागा अशी एक जागा आहे ज्यावर एकाच कुटुंबातील दोन सदस्यांचे भवितव्य आश्रित आहे. या जागेवर उच्चपदस्थ मुंडे कुटुंबातील दोन सदस्य समोरासमोर उभे आहेत. माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा गढ असलेल्या परळीत भाजपचे उमेदवार म्हणून गोपीनाथ मुंडेंची कन्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर पंकजासमोर आहे तिचा चुलत भाऊ आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे. धनंजय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. दरम्यान, यापूर्वी 2014 च्या निवडणुकीत पंकजाने धनंजयचा पराभव केला होता.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014  

पंकजा मुंडे, भाजप- 96,904

धनंजय मुंडे, राष्ट्रवादी- 71,009

परळी विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

अनंत गायकवाड, बीएसपी

पंकजा मुंडे, भाजपधनंजय मुंडे, राष्ट्रवादी

आष्टी विधानसभा मतदार संघ

आष्टी विधानसभा मतदार संघ, हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्ध नेते आणि मंत्र सुरेश धस यांचा मतदार संघ. धस आता भाजपचे विधानपरिषदेतील मंत्री आहे. या मतदार संघात 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बाजी मारली होती. सुरेश धस हे 1,18,847 मतांनी विजयी झाले होते. 2014 मध्ये त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा सामना केला होता. दिवंगत मुंडेंविरुद्ध धस यांनी लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांना सव्वा लाख मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत धसविरुद्ध भाजपने भीमराव धोंडे यांना मैदानात उतरवले. आणि धोंडेंनी धस यांचा 5 हजार मतांनी पराभव करत आमदारकी मिळवली. 2017 मध्ये धस भाजपमध्ये सहभागी झाले.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

भीमराव धोंडे, बीजेपी - 1,20,915

सुरेश धस, राष्ट्रवादी - 1,14,933

आष्टी विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

बाळासाहेब अजबे, राष्ट्रवादी

भीमराव धोंडे, भाजप

विष्णू गाडेकर, बीएसपी

महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण जागा 234 आहेत, तर अनुक्रमे 19 आणि 15 जागा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव आहेत. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर मत मोजणी 24 ऑक्टोबरला होईल.