Beed Teenager Suicide Case: चुलत्यासोबत शेतीच्या वादातून भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस ठेवत 20 वर्षीय मुलाची गळफास घेत आत्महत्या
त्यामध्ये शुभमला ताण असह्य झाला होता. यातून त्याने आत्महत्या केली.
कुटुंबात काकासोबत झालेल्या शेतीच्या वादामधून एका वीस वर्षीय मुलाने आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बीड (Beed) च्या नेकनूर (Neknoor) तालुक्यातील अंधापुरी (Andhapuri) गावामधील आहे. यामधील हृद्य हेलावणारी बाब म्हणजे शुभम बाळासाहेब जगताप या आत्महत्या केलेल्या मुलाने स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवून, गळफास घेऊन आयुष्य संपवलं. शेतीच्या वादावादीतून निर्माण झालेला ताण त्याला असह्य झाला आणि त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी मीडीयाशी बोलताना सांगितलं आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, शुभम रविवार, 9 जुलै च्या पहाटे 5 वाजता घरातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने मोबाईल वर भावपूर्ण श्रद्धांजली असं स्टेटस ठेवलं. त्यानंतर शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. लोकांना गावात ही घटना समजेपर्यंत सकाळचे 7 वाजले होते. लोकांनी शेताकडे जाण्यासाठी धावाधाव केली पण तो पर्यंत शुभमचा जीव गेला होता.
शुभमचे मामा शिवाजी घरत यांचा दावा आहे मागील काही दिवसांपासून भाचा शुभम आणि त्याचे काका यांच्यात शेतीतून वाद, भांडणं सुरू होती. त्यामध्ये शुभमला ताण असह्य झाला होता. या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. सध्या शुभमच्या आत्महत्या प्रकरणी तपास सुरू आहे. नक्की वाचा: Nashik Suicide Case: नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या; वडील आणि दोन मुलांनी गळफास लावून संपवली जीवनयात्रा .
शुभमच्या आत्महत्या प्रकरणामुळे बीड मध्ये त्याच्या अंधापुरी गावात शोककळा पसरली आहे.