Mumbai Police: सावधान! एटीएममधून पैसे काढायला जाताय? त्याआधी महाराष्ट्र पोलिसांनी शेअर केलेला हा व्हिडिओ नक्की बघा

यामुळे संबंधित व्यक्तींना गरजेनुसार पैसे काढण्यासाठी जवळच्या एटीएममध्ये (ATM) किंवा बॅंकेत जावा लागते.

ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

सध्याच्या काळात अनेकांचा पगार हातात न देता त्यांच्या बॅंकेच्या खात्यावर जमा केला जातो. यामुळे संबंधित व्यक्तींना गरजेनुसार पैसे काढण्यासाठी जवळच्या एटीएममध्ये (ATM) किंवा बॅंकेत जावे लागते. मात्र, मोठ्या प्रमाणात एटीएममधूनच पैसे काढले जातात. परंतु, एटीएममधून पैसे काढायला गेलेल्या अनेकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना उघडकील आल्या आहेत. यामुळे अशा धोक्यापासून सावधान राहण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी (Mumbai Police) सोशल मीडियावर एक महत्वाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सर्वांनाच हैराण करणारा ठरणार आहे. ज्यात चोरटे कशाप्रकारे एटीएम पिन क्रमांकाची चोरी करतात? याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच ही माहिती प्रत्येकासाठी फायदेशीर ठरणार आहे.

पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर लांबच्या लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. एटीएमबाहेर गर्दी असल्याने गडबडीत आपण अनेक चूका करतो. ज्यामुळे आपली फसवणूक होते. यामुळे संबंधित व्यक्तीचे बॅंक खाते रिकामे होते. हॅकर्स तुमचे एटीएम पिनचा क्रमांक कसा चोरतात? याबाबत संपूर्ण माहिती खालील व्हिडिओतून मिळणार आहे. हे देखील वाचा- Mumbai Police: 14 दिवसाच्या बाळासाठी मुंबई पोलीस देवदूत, घशात सेफ्टी पिन अडकल्याने झाला होता कासावीस

व्हिडिओ-

व्हिडिओत दाखवण्यात आलेल्या माहितीनुसार, एटीएम मशीनमध्ये स्लॉट असतो, ज्यात आपल्याला आपले कार्ड टाकावे लागते. त्यावेळी ग्राहकांना त्यांचा चार किंवा सहा अंकी पिन क्रमांक टाकणे गरजेचे असते. मात्र, ज्यावेळी आपण एटीएममध्ये कार्ड टाकतो, तेव्हा चोरटे त्यावरच आपला एक स्लॉट तयार करतात. ज्याचे कनेक्शन कॅमेऱ्याशी जोडलेले असते. हा कॅमेरा एटीएमच्या की पॅडच्या अगदी वर असतो. म्हणजेच या कॅमेऱ्यात आपण टाकलेला कोड चोरट्यांना दिसून येतो. याद्वारे चोर कार्डसह सर्व माहिती कॅमेर्‍यामध्ये कॅप्चर करतात आणि हॅकर्स पिन चोरतात. यामुळे यापुढे एटीएममधून पैसे काढताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.