माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक: अजित पवार यांच्या गटाला घवघवीत यश, सत्ताधारी तावरे गटाला धक्का
माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी दोन्ही पॅनलचे प्रत्येकी 21 आणि 14 अपक्ष उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी 23 फेब्रुवारी या दिवशी मतदान पार पडले. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा या कारखान्याचे सभासद आहेत.
Malegaon Sahakari Sakhar Karkhana Election Result: बारामती (Baramati) तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना (Malegaon Sahakari Sakhar Karkhana) संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीचे निकाल हाती आले आहेत. या निकालानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत गटाने एकहाती विजय मिळवला आहे. एकूण 21 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत निळकंठेश्वर (Nilkantheshwar Panel पॅनलला 16 जागा मिळाल्या आहेत. तर, भाजप पुरस्कृत तावरे गटाच्या सहकार बचाव (Sahakari Bachav Panel) पॅनलला केवळ 5 जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. काही करुन ही निवडणूक जिंकायचीच असा चंग बांधून गेले चार दिवस अजित पवार या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेऊन होते. (हेही वाचा, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द)
या निकालाने सत्ताधारी असलेल्या रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे या गटाला जोरदार धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या वर्चस्वातून धक्कादायकरिकत्या तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलने मागच्या निवडणुकीत हा कारखाना ताब्यात घेतला होता. मात्र, गतपराभवाचा वचपा काढत अजित पवार यांनी पुन्हा एकदा माळेगाव कारखान्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दरम्यान, उर्वरती राखीव असलेल्या पाच जागांवर मतमोजणी सुरु आहे. मात्र इथेही मोठ्या फरकाने निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवारच आघाडीवर आहेत.
दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी दोन्ही पॅनलचे प्रत्येकी 21 आणि 14 अपक्ष उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी 23 फेब्रुवारी या दिवशी मतदान पार पडले. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा या कारखान्याचे सभासद आहेत. त्यामुळे या कारखान्यात घडणाऱ्या घडामोडींवर सर्वांचेच लक्ष असते.
(The above story first appeared on LatestLY on Feb 25, 2020 10:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

