Bank Holidays March 2021: या आठवड्यात सलग 5 दिवस बँका बंद; आजच उरका महत्त्वाची कामं
11 मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त बँका बंद असतील. त्यानंतर 13-16 मार्च दरम्यान सलग 4 दिवस बँका बंद राहणार आहेत.
Bank Holidays March 2021: या आठवड्यात सलग 5 दिवस बँकांचे कामकाज ठप्प राहणार आहे. 11 मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त बँका बंद असतील. त्यानंतर 13-16 मार्च दरम्यान सलग 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. 13-14 मार्च रोजी दुसरा शनिवार-रविवार असल्याने बँका बंद (Bank Holidays) असतील. तर 15-16 मार्च रोजी बँकेचे स्ट्राईक (Bank Strike) असल्याने बँका बंद राहणार आहेत. सलग सुट्ट्यांमुळे नागरिकांचा खोळंबा होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाची कामे आजच उरकणे सोयीस्कर ठरणार आहे. तसंच शुक्रवार, 12 मार्च बँका सुरु असतील. दरम्यान, मार्च 2021 मध्ये बँका नेमक्या कधी बंद असतील जाणून घेऊया...
# आरबीआय हॉलिडे दिनदर्शिकेनुसार मार्च महिन्यात अनेक बँकाच्या सुट्या असतात. त्यापैकी 11 मार्च रोजी महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने देशातील अनेक राज्यांमधील सरकारी बँकांचे कामकाज या दिवशी बंद राहील.
# पुढील बँक हॉलिडे 22 मार्च रोजी आहे. बिहार दिन या दिवशी साजरा केला जातो. रविवार 21 मार्च रोजी बँका बंद असतात. त्यामुळे 21 व 22 मार्च रोजी बँका बंद राहतील.
# होळीची सुट्टी 29 आणि 30 मार्च रोजी आहे. त्यापूर्वी 27 आणि 28 मार्च रोजी चौथ्या शनिवारी आणि रविवारी आहे. त्यामुळे त्यादिवशी देशातील बहुतेक बँका बंद असतील. त्यामुळे सलग 4 दिवस बँका बंद राहतील.
दरम्यान, मार्च महिन्यात असलेल्या या सुट्ट्यांव्यतिरिक्त युनायडेट फॉरम ऑफ बँक युनियनने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खाजगीकरणाविरोधात 15 मार्च पासून दोन दिवसाचा बंद पुकारला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या बजेट भाषणात सार्वजनिक क्षेत्राच्या या दोन बँकांची खाजगीकरण करण्याची घोषणा केली होती.