DA Hike for Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 15.97% वाढणार, घ्या जाणून
बँक कर्मचाऱ्यांचा मे, जून आणि जुलै 2024 या महिन्यांसाठी त्यांचा महागाई भत्ता (DA Hike) 15.97% पर्यंत वाढलेला पाहायला मिळेल. इंडियन बँक असोसिएशन (IBA) ने 10 जून 2024 रोजी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
Bank Employees Dearness Allowance: बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांचा मे, जून आणि जुलै 2024 या महिन्यांसाठी त्यांचा महागाई भत्ता (DA Hike) 15.97% पर्यंत वाढलेला पाहायला मिळेल. इंडियन बँक असोसिएशन (IBA) ने 10 जून 2024 रोजी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. हा भत्ता समायोजनावर आधारीत असून 8 मार्च 2024 रोजीच्या 12 व्या द्विपक्षीय समझोत्याच्या खंड 13 आणि त्याच दिवशीच्या संयुक्त नोटच्या खंड 2 (i) मध्ये नमूद केलेल्या अटींना अनुसरुनही असेल. महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यास बँक कर्मचाऱ्यांना अच्छे दिन पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे डोळे ही वाढ प्रत्यक्ष आपल्या खात्यावर केव्हा जमा होते याकडे लागले आहेत.
अधिकाऱ्यांसाठी सविस्तर वेतन सुधारणा
- अधिसूचनेमध्ये बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी सविस्तर वेतन सुधारणा देखील नमूद केल्या आहेत.
ज्या अधिकाऱ्यांनी CAIIB (CAIIB भाग-II) पूर्ण केले आहे ते 1 नोव्हेंबर 2022 पासून दोन वेतनवाढीसाठी पात्र असतील.
- अधिसूचनेमध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की, 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणारी नवीन वेतनश्रेणी स्केल I ते VII पर्यंतच्या सर्व स्केलमध्ये रु. 48,480 ते रु. 1,73,860 पर्यंत आहे.
- संयुक्त टीप्पणीत असे म्हटले आहे की DA निर्देशांक 1960 = 100 ते 2016 = 100 मालिकेतून बदलत आहे, रूपांतरण घटक 0.06 वरून 0.99 वर बदलत आहे, ज्यामुळे बँक कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढेल. (हेही वाचा, Bank Employee: बँक कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मिळणार आनंदाची बातमी, सरकार लवकरच घेणार 'हा' मोठा निर्णय)
अखिल भारतीय सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक
मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीसाठी औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी (बेस 2016=100) पुष्टी केलेला अखिल भारतीय सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) खालीलप्रमाणे:
- जानेवारी 2024: 138.9
- फेब्रुवारी 2024: 139.2
- मार्च 2024: 138.9
तिमाहीसाठी सरासरी CPI 139 आहे, ज्यामुळे 123.03 गुणांच्या पायापेक्षा (Base) 15.97 गुणांची DA गणना होते. ही वाढ गेल्या तिमाहीतील सरासरी CPI 138.76 पेक्षा 0.24 पटींनी वाढली आहे. मार्च 2024 मध्ये, IBA आणि बँक कर्मचारी संघटनांनी 17% वार्षिक वेतनवाढीवर सहमती दर्शविली जी नोव्हेंबर 2022 पासून लागू झाली. या समायोजनामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी अंदाजे 8,284 कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक खर्च होईल, ज्यामुळे सुमारे 8 लाख बँक कर्मचाऱ्यांना फायदा होईल. (हेही वाचा - Byju’s Financial Crisis: कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी बायजूचे संस्थापक रवींद्रन यांनी घर ठेवले गहाण)
पाच दिवसांचा आठवडा
बँक कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळापासून पाच दिवसांच्या वर्क वीकची मागणी केली आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक युनियनने या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे, जो आता सरकारच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. मार्च 2024 मधील संयुक्त घोषणेमध्ये सर्व शनिवारांना बँक सुट्ट्या म्हणून मान्यता देण्यात आली होती. ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा मार्ग मोकळा झाला होता. दरम्यान, या मागणीबद्दल बँकांनी किमान कामाचे तास आणि ग्राहक सेवा कालावधी पूर्ण केल्याची खात्री करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करेल. IBA च्या विधानानुसार, सरकारी अधिसूचनेनंतर सुधारित कामाचे तास प्रभावी होतील.