Bank Employee Committed Suicide: वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

शुक्रवारी रात्री तो वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सहून परळला जाण्यासाठी टॅक्सीत बसला, पण नंतर त्याने ड्रायव्हरला सी लिंकवर नेण्यास सांगितले. यासंदर्भात वरळी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Bank Employee Committed Suicide: वांद्रे-वरळी सी-लिंकवरून (Bandra-Worli Sea Link) उडी मारून एका खासगी बँकेतील कर्मचारी (Bank Employee) असलेल्या 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाश सिंग (Akash Singh) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. आकाश मध्य मुंबईतील परळ येथील रहिवासी होता.

दरम्यान, शुक्रवारी रात्री तो वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सहून परळला जाण्यासाठी टॅक्सीत बसला, पण नंतर त्याने ड्रायव्हरला सी लिंकवर नेण्यास सांगितले. यासंदर्भात वरळी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. (हेही वाचा -Nagpur Crime News: भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, नागपूर येथील घटना

सी लिंकवर आकाश फोनवर बोलत होता. त्याने अचानक दावा केला की त्यांचा मोबाईल फोन खाली पडला आहे. ड्रायव्हरने कार बाजूला घेतल्यावर आकाश खाली उतरला आणि त्याने समुद्रात उडी मारली.

त्याचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासानुसार, आई-वडिलांसोबत राहणाऱ्या आकाशचे तीन महिन्यांपूर्वी प्रेयसीसोबत ब्रेकअप झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement