लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणार्‍या आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिस बनले डिलेव्हरी बॉय; बंगळूरू मध्ये केली कारवाई

(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)  लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या आणि महिलेवर बलात्कार करण्याला एका व्यक्तीला पकडण्यासाठी चक्क डिलेव्हरी बॉय बनून सापळा रचला. बंगळूरू (Bangalore) मध्ये आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी मुंबई पोलिसांनी वेषांतर करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत अशामध्ये आता गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी चक्क वेषांतर करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, मुंबईमध्ये अंधेरी परिसरात हेल्थ क्लब मध्ये महिलेची मोहम्मद शौकत या आरोपी तरूणाशी ओळख झाली होती. मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं आणि लग्नाच्या निर्णयापर्यंत दोघे जण पोहचले. दरम्यान आरोपी तरूणाने मुलीच्या कुटुंबाची देखील भेट घेतली. त्यांचा विश्वास संपादन केला मात्र त्याच्या डोक्यात वेगळाच कट शिजत होता. त्याने तरूणीला लग्नाचं आमिष दाखवत जाळ्यात ओढलं आणि तिचा गैरवापर केला. पीडीत तरूणीने पोलिसांत धाव घेतली.

मुंबई पोलिसांनी मोहम्मद शौकतचा ठावठिकाणा लावला. यामध्ये तो बंगळूरूमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. दरम्यान मोहम्मद शौकत हा ऑनलाईन फूड ऑर्डर करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉय बनून घरात प्रवेश मिळवला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान मोहम्मद शौकत हा फूटबॉल प्लेअर आहे आणि त्याने पीडितेच्या कुटुंबाकडून 5 लाख रूपये देखील घेतले आहेत.

मागील काही दिवसांमध्ये भारतामध्ये महिलांची फसवणूक आणि बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशामध्ये हाथरस बलात्कार प्रकरणी जनतेमध्ये रोष आहे. अनेकांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी  म्हणून सरकारकडे मागणी केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif