पुतळ्यांना अंतर्वस्त्र घालून विक्रीसाठी उघड्यावर ठेवण्यास बंदी; मुंबई महापालिकेचा निर्णय
काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर, काही विक्रेत्यांनी त्यावर नाराजीही व्यक्त केली आहे. काहींच्या मते पालिकेने जो काही निर्णय घेतला तो योग्यच आहे. अशा प्रकारमुळे महिलांच्या भावनांचा अपमान होतो. तर, काहींना वाटते की, पुतळ्यांना अंतर्वस्त्र घातल्याने कोणाच्याही भावनांचा अपमान होत नाही.
महिलांच्या अतर्वस्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदारांसाठी मुंबई महापालिका आयुक्तांनी (Mumbai Municipal Commissioner) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे दुकानात महिलांच्या अतर्वस्त्रांची विक्री करताना ती अतर्वस्त्रं मॅनिक्विन्स (Mannequins) म्हणजेच पुतळ्यांना घालून त्याचे दुकानाबाहेर प्रदर्शन मांडता येणार नाही. महिलांची अतर्वस्त्रं पुतळ्यांना घालून ती विक्रीसाठी दुकानाबाहेर ठेवण्यावर मुंबई महापालिकेच्या निर्णयामुळे बंदी आली आहे.
महिलांची अतर्वस्त्रं पुतळ्यांना घालून त्याचे दुकानाबाहेर प्रदर्शन मांडणे. तसेच, ती विक्रिसाठी ठेवणे हे महिलांच्या भावना दुखावणारे आहे. महिलांच्या भावनांचा अपमान केल्याप्रमाणे आहे. त्यामुले अशा पुतळ्यांवर (मॅनिक्विन्स) बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मुंबई महापालिकेतील नगरसेविका रितू तावडे या महिला नगरेसविकेने मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली होती. प्रदीर्घ काळ प्रशासनाकडे ही मागणी लाऊन धरल्यानंतर अखेर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, महापालिकेच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमठत आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर, काही विक्रेत्यांनी त्यावर नाराजीही व्यक्त केली आहे. काहींच्या मते पालिकेने जो काही निर्णय घेतला तो योग्यच आहे. अशा प्रकारमुळे महिलांच्या भावनांचा अपमान होतो. तर, काहींना वाटते की, पुतळ्यांना अंतर्वस्त्र घातल्याने कोणाच्याही भावनांचा अपमान होत नाही. (हेही वाचा, Cannes 2019 Red Carpet: ऐश्वर्या राय बच्चन मेटॅलिक गाऊनमध्ये अवतरली यंदा 'कान्स'च्या रेड कार्पेटवर; मेकअपने वेधलं लक्ष)
दरम्यान, या निर्णयावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही चर्चा होणे अपेक्षीत आहे. त्यामुळे पालिका सभागृहात यावर चर्चा होईल, असे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे.