Badlapur Crime: तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला, रुगणालयात उपचार सुरु, बदलापूरात मोठी खळबळ

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Badlapur Crime: बदलापूर (Badlapur) येथे एका तरुणावार जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ  उडाली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांच्या मनात सुरक्षतेचा प्रश्न उभा राहिला आहे. पूर्ववैमन्स्यातून रागाच्या भरात तरुणावर हल्ला करण्यात आल्याचे दिसून आले आहे.  या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. ही घटना गणेश नगर परिसरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहन पाठक (22 वर्षे) असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. बलदलापूर पश्चिमेकडील आशिर्वाद रुग्णालयत तरुणावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अज्ञाताविरुध्दांत कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस या संदर्भात अधिक तपसा करत आहे.

नेमकं काय घडल?

रोहन पाठक मित्रासोबत हॉटेल बाहेर उभा होता. त्यानंतर काही वेळाने एका कारमधून पात ते सहा जण आले आणि अचानक रोहनवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर घटनास्थळावरून ते कारमधून फरार झाले. रोहनला रुग्णालयता उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहित पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.