Badlapur Kondeshwar Waterfall : बदलापूर येथील कोंडेश्वर धबधब्यावर तरुणांची स्टंटबाजी, कुंडात उड्या मारून जीवाशी खेळ सुरू

यात लहान शाळकरी मुलांचाही समावेश आहे.

Photo Credit- x

Badlapur Kondeshwar Waterfall: महाराष्ट्रात मान्सून दाखल होताच ठिकठिकणी धबधबे वाहू लागल्याने अनेकांची पावले डोंगर भागाकडे वळू लागली आहेत. माळशेजपासून अगदी सिंहगडपर्यंत ठिकठिकाणी धबे अॅक्टीव्ह झाले आहेत. धबधबे आणि पाण्याचा आनंद लुटण्यासाठी काही अतिउत्साही मंडळी मात्र धबधब्यावर जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसत आहेत. बदलापूर येथील कोंडेश्वर धबधब्यावर तरुणवर्ग खोल कुंडात पाण्याचा अंदाज न घेता उड्या मारताना दिसत आहे. यात लहान शाळकरी मुलांचाही समावेश आहे. याआधीही स्टंटबाजीमुळे तेथे अनेकांना जीव गमवावा लागलयाचे वृत्त समजते. (हेही वाचा: Raigad Shocker: पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अलिबागमध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू)

दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येतात. पर्यटकांमध्ये मित्र- मैत्रिणी, कुंटुंबांचा यात समावेश असतो. इथं पाण्याचा प्रवाह इतका वेगानं होता, की एक लहानशी चूकही एखाद्याच्या जीवावर बेतली असती. त्यामुळं या स्टंटबाजांना आळा घालण्याचीच गरज आहे.(हेही वाचा: Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस मुंबईसह ठाण्यात पावसाचा यलो अलर्ट, रायगड आणि रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज)

नुकतीच मावळमध्ये पवना धरण परिसरात एका कॉलेज तरुणाचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पावसाळी सहलीसाठी तो इतर विद्यार्थ्यांसह तेथे आला होता. पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजचा तो विद्यार्थी होता. रविवारी ही घटना घडली. मुळचा दिल्लीचा रहिवासी असलेला अद्वैवता वर्मा हा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif