BAC Nursing Hostel, Nagpur: मुलींच्या हॉस्टेलमध्ये मध्यरात्री दारावर थाप, नागपूर येथील बीएसी नर्सिंग वसतिगृहातील घटना

या प्रकाराचा व्हिडिओही चित्रित केल्याचे समजते. नागपूर (Nagpur) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) GMC संलग्न असलेल्या वसतीगृहात हा प्रकार घडला आहे.

Girls' Hostel | (Photo Credits: Archived, edited)

मुलींच्या वसती गृहामध्ये (BAC Nursing Hostel, Nagpur) मध्यरात्री प्रवेश करत त्या राहात असलेल्या खोल्यांच्या दरवाजावर जाऊन एक व्यक्ती टकटक करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओही चित्रित केल्याचे समजते. नागपूर (Nagpur) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) GMC संलग्न असलेल्या वसतीगृहात हा प्रकार घडला आहे. दारांवर टकटक करणारा व्यक्ती युवक असून त्याची ओळख पटली नाही. मात्र, तो मनोरुग्ण असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सांगितले जात आहे की, अज्ञात व्यक्ती मुलींच्या वसतीगृहावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांची नजर चुकवतो. तसेच, चोरट्या मार्गाने वसती गृाहमध्ये प्रवेश करतो. दरम्यान, हा व्यक्ती मुलींच्या दरवाजावर टकटक करुन त्यांना घाबरवतो. तो साधारण 25 ते 30 या वयोगटातील असल्याचे वर्णन केले जात आहे. या तरुणाच्या वर्तनाचे काही मुलींनी धाडसाने चित्रिकरण केले आहे. दरम्यान, या व्यक्तीच्या वर्तनामुळे मुलींच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Satara: इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी गर्भवती, नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; सातारा येथील घटना)

दरम्यान, या तरुणाला काही मुलींनी हटकले असता तो आपण इथे चुकून आल्याचे सांगतो, असेही बोलले जात आहे. मुलींच्या वसतीगृहात शिरणारा तरुण नेमका कोण आहे? याचा शोध घेतला जावा अशी मागणी पुढे येत आहे. हा तरुण 2 फेब्रुबारीच्या मध्य रात्री मुलींच्या वसतीगृहामध्ये शिरला होता. हा इसम वसती गृहात प्रवेश करुनच थांबल नाही. तर त्याने चक्क मुलींच्या खोलीचा दरवाजा ठोकून त्यांना घाबरविण्याचाही प्रयत्न केला. घाबरलेल्या तरुणांनी एकमेकांना संपर्क करुन उठवले. ज्यानंतर काही तरुणींनी या तरुणाचा व्हिडिओ बनवला. दरम्यान, वसती गृहातील विद्यार्थिनींनी प्रशासनाकडे आणि प्राचार्यांकडे तक्रारी केली. त्यानंतर वसती गृह परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.