Baby Selling In Mumbai: आई-बापाने पोटच्या बाळाचा गे पुरूषासोबत केला 4.65 लाखांचा व्यवहार; 6 जण अटकेत
जेव्हा 43 वर्षीय इंदर मेहरवाल, जे आपल्या 70 वर्षांच्या आईसोबत राहतात यांना एक मूल दत्तक घेण्याची इच्छा होती आणि ही इच्छा त्यांच्या सहकारी सायबा अन्सारी या ट्रान्सजेंडर व्यक्तीला सांगितली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.
मुंबई मध्ये दोन व्यक्तींनी एक तान्ह बाळं 4.65 लाख रूपयांना गे पुरूषाला विकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रविवार 26 मे दिवशी पहिल्यांदा मालवणी पोलिस स्टेशन (Malvani Police Station) मध्ये बाळाच्या आत्येकडून याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी कारवाई करत 6 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये बाळाच्या पालकांचा देखील समावेश आहे. डी एन नगर पोलिसांकडून बाळाची सुटका करण्यात आली असून त्याला सुरक्षितपणे अंधेरीच्या St Catherine Child Shelter मध्ये ठेवण्यात आले. सध्या या प्रकरणामध्ये पुढील तपास सुरू आहे.
Indian Express च्या वृत्तानुसार, बादशाह च्या बहिणीला बाळ जवळ नसल्याचं दिसताच ती बाळाच्या पालकांना घेऊन मालवणी पोलिस स्टेशन मध्ये पोहचले. सुरूवातीला बाळाच्या पालकांनी एका अॅड फिल्मच्या शूट दरम्यान आपल्या 19 महिन्याच्या बाळाचं अपहरण झाल्याचा किस्सा रंगवला. पालकांच्या जबाबामध्ये विसंगती आढळून येत असल्याचं पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी उलट तपासणी सुरू केली आणि आर्थिक विवंचनेतून आपणच बाळाचा सौदा केल्याचं त्यांनी कबूल केले. Bead Crime: एक वर्षाच्या बाळाची 3.5 लाख रुपयांना विक्री, पाच आरोपींना अटक, दोघे फरार; बीड येथील घटना .
रिपोर्टनुसार, जेव्हा 43 वर्षीय इंदर मेहरवाल, जे आपल्या 70 वर्षांच्या आईसोबत राहतात यांना एक मूल दत्तक घेण्याची इच्छा होती आणि ही इच्छा त्यांच्या सहकारी सायबा अन्सारी या ट्रान्सजेंडर व्यक्तीला सांगितली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. मेहरवाल हा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यावसायिक होता, त्याला कायदेशीर दत्तक प्रक्रिया त्याच्या गुंतागुंतीमुळे टाळायची होती. त्याची परिस्थिती समजून सायबाने दुसरी आरोपी राबिया परवीन अन्सारीला विनंती केली, ज्याने तिच्या नातेवाईक, सकीना बानू शेख, जी मुलाच्या आई-वडिलांच्या जवळ राहते तिच्यासोबत सौदा केला.
वैद्यकीय चाचण्यांनी मुलाच्या आरोग्याची पुष्टी केल्यानंतर, पालकांना पेमेंटचा काही भाग रोख आणि उर्वरित ऑनलाइन पेमेंट द्वारा दिला. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, डीएन नगर पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केली. बादशाहचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत आणि मेहरवालसह इतर आरोपींना IPC च्या कलम 370 आणि 34 आणि बाल न्याय कायद्याच्या कलम 80 आणि 81 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या दाम्पत्याने यापूर्वी त्यांच्या इतर मुलांना विकले होते का, याचा अधिक तपास सुरू आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)